30.1 C
Latur
Thursday, March 6, 2025
Homeराष्ट्रीयभगवान राम संपूर्ण जगाचे : फारुख अब्दुल्ला

भगवान राम संपूर्ण जगाचे : फारुख अब्दुल्ला

श्रीनगर : नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांनी शनिवारी अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या लोकांचे अभिनंदन केले आणि म्हटले की, भारतात बंधुभाव कमी होत आहे आणि तो पुन्हा प्रस्थापित करण्याची गरज आहे. वृत्तसंस्थेशी बोलताना जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री म्हणाले की, अयोध्येत राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. ज्यांनी मंदिरासाठी प्रयत्न केले त्या सर्वांचे मी अभिनंदन करू इच्छितो. मंदिर आता तयार झाले आहे. भगवान रॅम केवळ हिंदींचेच नसून ते संपूर्ण जगाचे आहेत, असे ते म्हणाले.

फारुख अब्दुल्ला म्हणाले की, मी संपूर्ण देशाला हे देखील सांगू इच्छितो की प्रभू राम केवळ हिंदूंचे नाहीत, ते जगातील सर्व लोकांचे आहेत. ते जगभरातील सर्व लोकांचे भगवान आहेत. हे पुस्तकांमध्ये लिहिलेले आहे. अब्दुल्ला पुढे म्हणाले की, भगवान राम यांनी बंधुता, प्रेम, एकता आणि एकमेकांना मदत करण्याचा संदेश दिला आहे. त्यांनी नेहमीच लोकांचे उत्थान करण्याचे सांगितले आहे, मग ते कोणत्याही धर्माचे किंवा जातीचे असोत. आज जेव्हा मंदिराचे उद्घाटन होणार आहे, तेव्हा मला देशातील जनतेला सांगायचे आहे की, आपल्या देशात कमी होत चाललेला बंधुभाव पुन्हा जिवंत करा. मला सर्वांना सांगायचे आहे की मला बंधुभाव जपायचा आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR