20.2 C
Latur
Monday, February 24, 2025
Homeमहाराष्ट्रमहादेव जानकर महायुतीतून पडणार बाहेर

महादेव जानकर महायुतीतून पडणार बाहेर

२८८ जागांवर उमेदवार उभे करणार

मुंबई : प्रतिनिधी
राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर महायुतीची साथ सोडणार आहेत. महायुतीच्या जागावाटपात आपल्याला विचारात न घेतल्याने महादेव जानकर यांनी महायुतीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. महादेव जानकर यांचा पक्ष सर्व २८८ जागा लढवणार आहे. जानकर यांच्या पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी दोन दिवसांत जाहीर होणार आहे.

दरम्यान, महाराष्ट्राच्या राजकारणात आता ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. कारण राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा महादेव जानकर यांनी टोकाचा निर्णय घेतला आहे. महादेव जानकर यांनी थेट महायुतीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. महादेव जानकर हे राज्यातील विधानसभेच्या सर्व २८८ जागा लढवण्यावर ठाम आहेत त्यामुळे महायुतीची डोकेदुखी वाढण्याची जास्त शक्यता आहे. महादेव जानकर गेल्या काही दिवसांपासून महायुतीत नाराज असल्याची चर्चा सुरू होती. महायुतीच्या जागावाटपात आपल्याला विचारलं जात नाही, अशी महादेव जानकर यांची खंत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

महादेव जानकर यांना धनगर समाजाचा मोठा पाठिंबा आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये महादेव जानकर यांच्या पक्षाची ताकद आहे. महादेव जानकर यांची सोलापूर, बारामती, मराठवाड्यातील काही भाग, परभणी, बीड, जालना आणि कर्नाटक लगतच्या प्रदेशात मोठी ताकद आहे. जिथे धनगर समाजाची संख्या जास्त आहे तिथे महादेव जानकर यांच्या पक्षाला चांगला पाठिंबा आहे. त्यामुळे जानकर यांनी महायुतीला सोडचिठ्ठी देणे ही महायुतीसाठी डोकेदुखी ठरू शकते. त्यामुळे जातीय समीकरणांचा विचार करता भाजपला महादेव जानकर यांची मनधरणी करण्यात यश येते का? ते पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR