27.5 C
Latur
Saturday, September 21, 2024
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्र गहाण ठेवला, विकायला कमी करणार नाहीत

महाराष्ट्र गहाण ठेवला, विकायला कमी करणार नाहीत

लाडकी बहीण योजनेवरून विजय वडेट्टीवार कडाडले

मुंबई : प्रतिनिधी
लाडकी बहीण योजना विधानसभेत गेमचेंजर ठरेल, असा आत्मविश्वास महायुतीच्या नेत्यांना आहे. त्यामुळे सरकार या योजनेचा जोरदार प्रचार करत आहे. या योजनेचा पहिला हप्ता देखील महिलांच्या खात्यात जमा झाला. मात्र, या योजनेच्या जाहिरातीवर होणा-या खर्चावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

जेमतेम मोजक्या बहिणींना योजनेचा पहिला हप्ता मिळाला, परंतु ढोल पिटण्यासाठी मात्र १ कोटी ८१ लाख रुपयांचे बिल राज्याच्या तिजोरीवर लावण्यात आले, असे ट्विट करत वडेट्टीवार यांनी सरकारला घेरले.

सरकारने लाडकी बहीण योजनेच्या प्रचार आणि प्रसारासाठी २७० कोटींचा जीआर काढला असताना आता फक्त लाडकी बहीण योजनेच्या प्रचारासाठी तब्बल ११९ कोटी ८१ लाख खर्च केला जाणार आहे. विशेष म्हणजे १५ ऑगस्ट सुटीचा दिवस असताना हा जीआर काढण्यात आला आहे, असे आपल्या ट्विटमध्ये म्हणत सरकार करत असेल्या खर्चावर विजय वडेट्टीवार यांनी आक्षेप घेतला आहे.

स्वत:च्या हितासाठी राबणारे सरकार
सुटीच्या दिवशीच काय पण कामकाजाच्या दिवशी देखील सामान्य लोकांची कामे मंत्रालयात होत नाहीत. मात्र, महायुतीत सामील पक्षांच्या हिताचे सरकारी निर्णय घेण्यासाठी १५ ऑगस्टचा दिवस सुद्धा सत्ताधारी आणि शासकीय यंत्रणा सोडत नाही. स्वत:च्या हितासाठी राबणारे किती हे तत्पर सरकार, असा टोला विजय वडेट्टीवार यांनी लगावला आहे.
जेमतेम मोजक्या बहिणींना योजनेचा पहिला हप्ता मिळाला, परंतु ढोल पिटण्यासाठी मात्र १९९ कोटी ८१ लाख रुपयांचे बिल राज्याच्या तिजोरीवर लावण्यात आले.

महाराष्ट्र गहाण ठेवला
सरकारला शेतक-यांना नुकसानभरपाई, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती, युवकांना नोक-या द्यायला पैसे नाहीत, पण स्वत:ची बढाई करण्यासाठी जाहिरातीसाठी मात्र भरमसाठ खर्च सुरू आहे. दिल्लीत बसलेल्या सरदारांना खुश ठेवण्यासाठी आधीच महाराष्ट्र गहाण ठेवला आहे. येणा-या विधानसभेत मतांसाठी महायुतीतील तीनही पक्ष मिळून महाराष्ट्र विकायला पण कमी करणार नाहीत, असा आरोप आपल्या ट्विटमध्ये वडेट्टीवार यांनी केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR