परभणी : महाराष्ट्र राज्य नेटबॉल असोसिएशन वतीने दि. १४ डिसेंबर हरियाणा येथे होत असलेल्या १५वी सिनियर राष्ट्रीय फेडरेशन कप नेटबॉल क्रीडा स्पर्धा २०२३-२४ साठी संघ रवाना झाला. या संघात परभणी जिल्ह्यातील ४ चार खेळाडूंचा समावेश आहे.
महाराष्ट्र राज्य नेटबॉल पुरुष संघ वैभव ताठे (कर्णधार), अनिल डवरे, पांडूरंग हजारे, प्रताप डख, आकाश पवार, सय्यद इरतेकाज, लिलेश्र्वर कोल्हे, आदित्य खाडे, अजित गाडे, अरविंद राऊत, शुभम ठाकरे, चंद्रकुमार नागपुरे यांचा समावेश आहे. तर संघ प्रशिक्षक योगेश पांडे, संघ व्यवस्थापक अरविंद सोनवणे आहेत. या संघास महाराष्ट्र राज्य अध्यक्ष विपीन कामदार, सचिव डॉ. ललित जिवाणी, परभणी जिल्हा नेटबॉल संघटनेचे सचिव कैलास माने, राष्ट्रीय प्रशिक्षक महेशकुमार काळदाते, मनीष जाधव, नंदकिशोर राऊत,अमोल बिचाले आदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.