22.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रमहाविकास आघाडीचा लोकसभा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला?

महाविकास आघाडीचा लोकसभा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला?

राजकीय पक्षांकडून  तयारी सुरू

छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला येत्या २९ आणि ३० डिसेंबर रोजी ठरणार आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नागपूर दौ-यानंतर दिल्लीत जागावाटपाबाबत बैठक होणार आहे. जागावाटपाबाबत दोन फॉर्म्युल्यांवर चर्चा होऊ शकते. महत्त्वाचं म्हणजे छत्रपती संभाजीनगरची जागा लढवण्यासाठी एका पक्षातील बडा नेता काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतो असेही कळते.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काही महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना आता राजकीय पक्षांकडून लोकसभा जागा लढवण्यासाठीची तयारी सुरू करण्यात आली आहे. देशव्यापी पातळीवरील इंडिया आघाडीतील महाविकास आघाडीतही जागावाटपाचे सूत्र निश्चित झाल्याची चर्चा सुरू आहे. राज्यात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस यांचा समावेश असलेल्या महाविकास आघाडीमध्ये जागावाटप जवळपास निश्चित झाल्याची चर्चा आहे. अशातच आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणुकीत १५ ते १६ जागा लढवण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.

मविआसोबत आणखी कोणते पक्ष?
महाविकास आघाडीसोबत डाव्या-प्रागतिक पक्षांची आघाडी आहे. यामध्ये डावे पक्ष, समाजवादी पक्ष, शेकाप आदी पक्ष आहेत. तर, वंचित बहुजन आघाडीची शिवसेना ठाकरे गटासोबत युती आहे. त्यामुळे जागा वाटप करताना या पक्षांनादेखील विचारात घ्यावे लागणार आहे. या पक्षांना लोकसभेसाठी जागा न सोडल्यास विधानसभेसाठी जागा मविआला सोडाव्याच लागणार आहेत. त्यामुळे मविआमध्ये लोकसभा जागा वाटप वर दिलेल्या फॉर्म्युल्याप्रमाणे होते की आणखी काही फॉर्म्युला ठरतोय, हे लवकरच समजेल.

कोणताही फॉर्म्युला ठरला नाही : नाना पटोले
महाराष्ट्रात लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भात कोणताही फॉर्म्युला ठरला नाही. संजय राऊत कुठून आकडे देतात त्यांना माहीत नाही. संजय राऊत यांना बोलायची सवय आहे त्यांच्या आकड्यावर मी बोलणार नाही. २९ डिसेंबर रोजी काँग्रेसची बैठक आहे. त्या बैठकीत मित्रपक्षांसोबत जागावाटपावर चर्चा होईल. मेरीटच्या आधारावर जागा वाटप अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR