18.7 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeसोलापूरमाहेश्वरी प्रगति मंडल च्यावतीने समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

माहेश्वरी प्रगति मंडल च्यावतीने समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

सोलापूर : माहेश्वरी प्रगति मंडळाच्या वतीने समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारभ आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम शिवस्मारक सभागृह येथे संपन्न झाला. अकोला येथील डॉ.महेश मुंदडा यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्यापारी सहकारी बँकेचे गिरिधारी भुतडा हे होते. दीप प्रज्वलन तथा सरस्वती पूजनाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. महेश मुंदडा यांनी “जीद करो दुनिया बदलो” या विषयास अनुसरून मार्गदर्शन केले.आयुष्यात जिद्द व चिकाटी या दोन गोष्टींमुळे च आपण यशस्वी होऊ शकतो.जिद्द चिकाटी ह्या अशा गोष्टी आहेत ज्या मुळे आपण थकत नाही कारण की आपल्याला आपले लक्ष्य पूर्ण करायचं असतं. महात्मा गांधी सचिन तेंडुलकर अशे अनेक उदाहरण असतील की ज्यांच्या जिद्दी मुळे ते यशस्वी होऊ शकले. जेवढे आपण मेहनत करू तेवढे आपल्याला आपल्या यशस्वी होण्यासाठी कोणी रोखू शकणार नाही.

आपण आपल्या पालकांसोबत सुद्धा मन मोकळे पणाने राहिले पाहिजे .सध्या सोशल मीडिया मुळे आपण आपल्या पालकांपासून परिवार पासून दूर जाऊ लागलो आहोत. वेळीच आपण ह्या गोष्टीचा विचार करणे गरजेचे आहे. कार्यक्रमात समाजातील 120 विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमात पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने तसेच समाजातील व्यक्ती व्यापारी बँकेचे संचालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधक्ष्य श्री शामसुंदर बिहानी यांनी केले तथा सूत्र संचालन पूनम दरगड व प्रमोद भुतडा यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR