नवी दिल्ली : लाच घेऊन संसदेत प्रश्न विचारल्याप्रकरणी महुआ मोईत्रा यांचे लोकसभा सदस्यत्व शुक्रवारी (८ डिसेंबर) रद्द करण्यात आले आहे. याबाबत मोईत्रा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून या निर्णयाला सर्वोच न्यायालयात आव्हान दिले आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आचार समितीच्या अहवालावर संसदेत मतदान घेतले, जे आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले. याबाबत पत्रकारांशी बोलताना महुआ म्हणाल्या की, नीतिशास्त्र समितीने माझ्यावर दबाव टाकण्यासाठी प्रत्येक नियम मोडला आहे. भाजपच्या अंताची ही सुरुवात आहे.
या निर्णयाविरोधात महुआ मोईत्रा यांनी संविधानाच्या कलम २२६ अन्वये उच्च न्यायालयात न जाता, कलम ३२ अंतर्गत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. संसदेत मंजूर झालेल्या कायद्यांना सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकते, जे त्यांनी केले आहे. महुआ निर्दोष आढळल्यास त्यांचे निलंबन रद्द होऊन खासदारकीचा दर्जा बहाल केला जाऊ शकतो. जर त्या दोषी आढळल्यास त्यांचे सर्व मार्ग बंद होऊ शकतात.