22.3 C
Latur
Tuesday, January 21, 2025
Homeराष्ट्रीयलडाखमध्ये मोठी दुर्घटना; नदीत युध्द सराव करताना ५ जवान शहीद

लडाखमध्ये मोठी दुर्घटना; नदीत युध्द सराव करताना ५ जवान शहीद

नवी दिल्ली : केंद्रशासित प्रदेश लडाखमध्ये भारतीय लष्कराच्या जवानांसोबत मोठी दुर्घटना घडली आहे. लडाखमधील दौलत बेग ओल्डी भागात लष्कराचे जवान नदीत युध्द सराव करत होते. यावेळी पाण्याची पातळी अचानक वाढल्याने लष्कराचे पाच जवान वाहून गेले. भारतीय लष्कराच्या जवानांसोबतचा हा अपघात चीनच्या सीमेजवळ म्हणजेच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ घडला. दौलत बेग हे ओल्डी काराकोरम रेंजमध्ये वसलेले आहे, जिथे लष्कराचा तळ आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लडाखमधील एलएसीजवळ आर्मी रणगाड्याच्या सहाय्याने लष्कराचे जवान नदी ओलांडण्याचा सराव करत होते. त्यावेळी अचानक नदीच्या पाण्याची पातळी वाढली आणि रणगाडा नदीच्या खोल भागात अडकला. रणगाड्यावरील पाच सैनिक वाहून गेले. सध्या शोधमोहीम सुरू आहे.

लष्कराच्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी मध्य रात्री १ वाजण्याच्या सुमारास टी -७२ रणगाड्यासह युध्दजन्य परिस्थितीत नदी कशी पार करायची याचा सराव सुरू असताना ही घटना घडली. या दुर्घटनेच्या वेळी रणगाड्यात एक जेसीओ आणि चार जवानांसह पाच सैनिक होते. सर्व ५ जवान शहीद झाले आहेत, असे संरक्षण अधिका-यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR