तुळजापूर : तुळजापूर महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री ‘तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्रोत्सव पूर्वीच्या मंचकी निद्रेस मंगळवार (दि.२४) रात्री प्रारंभ झाला. तुळजाभवानी मातेच्या मंचकी निद्रेसाठीची प्रथमता मंदिरात सकाळी महिलांनी देविच्या गादीचा कापूस पिंजण्यासाठी गर्दी केली होती.
त्यांनी प्रथम गादीच्या कापसाची हळदी-कुंकूवाने पूजा केली व नंतर एकमेकांना कुंकू लावून देविची गीत गात कापूस पिंजला तो मुस्लिम धर्मिय पिंजारी यांनी पिंजला नंतर नकाते कुटुंबियांनी गाद्यामध्ये कापूस भरला गादी शेजघरात नेल्या तिथे पलंगे कुटुंबियांनी पलंगावर सुताच्या पट्ट्या खा तयार गाद्या ठेवल्या व देविजींच्या निद्रेसाठी पलंग खोली तयार करण्यात आली.
सायंकाळी देविजीस भाविकांचे पंचामृत अभिषेक पूजा झाल्यानंतर मुर्ती चांदी पलंगावर निद्रीस्त करण्यात आली. नंतर विधीवत पुजा करण्यात आली नंतर प्रक्षाळ करण्यात आली. पुजेनंतर मंदिर बंद करण्यात आले. यावेळी महंत मंदीर विश्वस्त प्रशासकीयव्यवस्थापक तथा तहसिलदार धार्मिक व्यवस्थापक पाळीचे भोपे पुजारी सेवेदार कर्मचारी शासकीय अधिकारी उपस्थितीत होते.