22.9 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeलातूरएकमतचे मुख्य संपादक मंगेश देशपांडे-डोंग्रजकर यांना ‘लोकराजा राजर्षी शाहू गौरव राष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर

एकमतचे मुख्य संपादक मंगेश देशपांडे-डोंग्रजकर यांना ‘लोकराजा राजर्षी शाहू गौरव राष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर

‘अविष्कार’चे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष संजय पवार यांची माहिती

लातूर/कोल्हापूर : पत्रकारीता क्षेत्रात केलेल्या आणि करीत असलेल्या विशेष कामाची नोंद घेऊन अविष्कार फाऊंडेशन कोल्हापूर(महाराष्ट्र)च्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा राष्ट्रीय स्तरावरील लोकराजा राजर्षी शाहू गौरव पुरस्कार २०२४, ‘दैनिक एकमत’चे मुख्य संपादक मंगेश अमृतराव देशपांडे (डोंग्रजकर) लातूर यांना जाहीर झाला. या पुरस्काराचे वितरण रविवार दि. ३० जून रोजी सकाळी १०.३० वाजता राजर्षि शाहू स्मारक भवन, मुख्य सभागृह, दसरा चौक, कोल्हापूर(महाराष्ट्र) येथे करण्यात येणार आहे.

आविष्कार फाऊंडेशन ही सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, आरोग्य, सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणारी संस्था असून गेल्या १७ वर्षांपासून समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले आणि करीत असलेल्या व्यक्तींना विविध पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते तसेच गरजूंना विविध प्रकारची मदतही केली जाते. प्रतिवर्षाप्रमाणे राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने लोकराजा राजर्षी शाहू गौरव पुरस्कार कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे.

दरम्यान, एकमतचे मुख्य संपादक मंगेश अमृतराव देशपांडे (डोंग्रजकर) यांच्या पत्रकारीता क्षेत्रात करीत असलेल्या विशेष कामाची नोंद घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. सदर पुरस्कारामुळे आपल्या कार्यास नक्कीच बळ मिळेल अशी अपेक्षा निवड समितीच्या सदस्य आणि अविष्कार फाऊंडेशनच्या संस्थापक सचिव सौ. पी. एस. पवार यांनी व्यक्त केली असून पुरस्कार स्विकारण्यासाठी आपण सहपरिवार, मित्रपरिवार उपस्थित राहावे असे आवाहन प्रसिद्धी पत्रकातून केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR