मुंबई : प्रतिनिधी
विधानसभा निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढणा-या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने शनिवारी निवडणुकीसाठी पक्षाची स्वतंत्र जाहीरनामा समिती घोषित केली. सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गठित करण्यात आलेल्या या समितीत १७ सदस्यांचा समावेश आहे.
पुढील महिन्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत जनतेला पुढील ५ वर्षासाठी कोणती आश्वासने द्यायची यावर ही समिती विचार करणार आहे. त्यानंतर समितीच्या सूचनांचा पक्षाचा जाहीरनाम्यात समावेश करण्यात येणार आहे. कृषिमंत्री धनंजय मुंडे, मदत आणि पुनर्वसनमंत्री अनिल भाईदास पाटील, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, महिला आणि बाल विकासमंत्री आदिती तटकरे, पक्षाचे मुंबई विभागीय अध्यक्ष समीर भुजबळ, आमदार इद्रिस नायकवडी, अविनाश आदिक, रुपाली चाकणकर, वैशाली नागवडे, रुपाली ठोंबरे पाटील, सूरज चव्हाण, नजीब मुल्ला, कल्याण आखाडे, सुनील मगरे, संजय मिस्किन, आनंद परांजपे हे जाहीरनामा समितीचे सदस्य आहेत तर आमदार शिवाजीराव गर्जे हे समितीचे निमंत्रक आहेत.