21.5 C
Latur
Saturday, February 24, 2024
Homeमहाराष्ट्रमांजाने गळा कापला, पोलिसाचा जागीच मृत्यू

मांजाने गळा कापला, पोलिसाचा जागीच मृत्यू

मुंबई : ड्युटीवरून घरी जाताना एका पोलिस कर्मचाऱ्यावर काळाने घाला घातला. गाडीवरून जाताना पतंगाचा मांजा गळ्याला लागल्याने गळा चिरून त्याचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुरेश जाधव असे या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव असून त्याच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

सुरेश जाधव हे दिंडोशी पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असून ते ड्युटी संपल्यानंतर घरी निघाले. वरळी येथे त्यांचे निवासस्थान आहे. सांताक्रूजमधील वाकोला ब्रिज या ठिकाणी आल्यानंतर मांजाने त्यांचा गळा चिरला. उपचारासाठी त्यांना सायन रुग्णालयात नेल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले. दरम्यान दिंडोशी पोलीस स्थानकाकडून यासंबंधित एक निवदेन जारी करण्यात आलं आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR