29.9 C
Latur
Tuesday, January 21, 2025
Homeमहाराष्ट्रमांजाने घेतला पोलिसाचा बळी

मांजाने घेतला पोलिसाचा बळी

मुंबई : धोकादायक आणि धारदार मांजामुळे अनेक दुर्घटना, अपघात झाल्याच्या अनेक घटना आपण ऐकल्या असतील. मात्र आता हाच मांजा प्राणघातक ठरला आहे. एका मांजामुळे पोलिसाला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना मुंबईत उघडकीस आली आहे.

ड्युटी संपवून बाईकवरून घरी परत जात असताना पतंगाच्या मांजाने गळा चिरला गेल्याने पोलिसाचा दुर्दैवी मृत्यू झाला. समीर सुरेश जाधव असे मृत पोलिस हवालदाराचे नाव असून याप्रकरण खेरवाडी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वाकोला परिसरात ही दुर्दैवी घटना घडली. समीर जाधव वरळीतील बीडीडी चाळीत वास्तव्यास होते तर गोरेगावमधील ंिदडोशी पोलिस ठाण्यात ड्युटी करत होते. रविवारी दुपारी काम संपवल्यानंतर जाधव त्यांच्या बाईकवरून घरी परत जात असतानाच वाकोला पुलावर त्यांच्यासमोर अचानक पतंगाचा एक मांजा आला. त्यातून वाचण्याचा प्रयत्न करत असतानाचा त्या मांजाने त्यांचा गळा चिरला गेला. रक्त येत असल्याने ते स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न करत होचे, मात्र तेवढ्यात ते बाईकवरून खाली पडून गंभीर जखमी झाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR