27.4 C
Latur
Tuesday, January 21, 2025
Homeमहाराष्ट्रमनोज जरांगे पाटील यांच्या ‘डुप्लिकेट’ची वंचितमध्ये एन्ट्री

मनोज जरांगे पाटील यांच्या ‘डुप्लिकेट’ची वंचितमध्ये एन्ट्री

प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीत केला पक्ष प्रवेश

अकोला : मनोज जरांगे पाटील यांच्यासारखे हुबेहूब दिसणारे तुळशीराम गुजर यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा असलेल्या प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत त्यांनी हा पक्ष प्रवेश केला आहे.

अकोल्यातील जुन्या शहरात राहणारे तुळशीराम गुजर हे हुबेहूब मनोज जरांगे पाटील यांच्यासारखे दिसतात. नुकतेच ते अकोला शहरातून मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी अंतरवाली सराटीसाठी निघाले होते. त्यापूर्वी त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची अकोला येथे भेट घेतली. त्यावेळी त्यांनी हा पक्ष प्रवेश केला आहे.

तुळशीराम गुजर हे एक सर्वसामान्य व्यक्ती असून ते अकोला शहरातील जुने शहर वस्तीत राहतात. योगायोगाने ते मनोज जरांगे पाटील यांच्यासारखे दिसतात. अनेकांना ते प्रथमदर्शनी जरांगे पाटीलच असल्याचा भास होतो. शिवाय ते हल्ली पेहराव देखील जरांगे पाटील यांच्यासारखा करतात. त्यामुळे अनेकांना आपण बघत असलेली व्यक्ती इतर कोणी नसून जरांगे पाटीलच आहेत असा समज होतो. तुळशीराम गुजर म्हणतात की, मला फार अभिमान वाटतो, की मी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यासारखा दिसतो. दररोज अनेक लोक मला येऊन भटतात, माझे कौतुक करतात, माझ्यासोबत सेल्फीही घेतात. मला देखील त्यातून आनंद मिळत असल्याचे गुजर म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR