जालना : सरकार आणि मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांच्यात मध्यस्थी करत असलेले बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी गुरूवारी दुपारी अंतरवालीत दाखल झाले. आ. राऊत आणि मनोज जरांगे यांच्यात चर्चा झाली. यावेळी तुम्ही पुन्हा उपोषणाला बसू नये, अशी राज्य सरकारची भूमिका असल्याचा निरोप आमदार राजेंद्र राऊत यांनी मनोज जरांगे यांना दिला.
बुधवारी मनोज जरांगे यांनी आमदार राजेंद्र राऊत यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर आज आ. राऊत यांनी जरांगेंची भेट घेतली. जरांगे यांचा माझ्या बाबत गैरसमज झालेला आहे. माझ्या पोटात इन्फेक्शन झाल्याने मी भेटीला आलो नाही. तसेच सभागृहात पण अधिवेशनावेळी मी एकच दिवस गेलो असे म्हणत राऊत यांनी जरांगे यांच्या टीकेवर स्पष्टीकरण दिले आहे.
दरम्यान, आमदार राजेंद्र राऊत आणि जरांगे पाटील यांच्यात चर्चा झाली. यावेळी आ. राऊत यांनी फोनवरून मंत्री शंभूराज देसाई यांच्यासोबत संपर्क साधला. मात्र, जरांगे आणि शंभूराज देसाई यांची चर्चा होऊ शकली नाही. सरकारने किंंवा सरकारच्या प्रतिनिधींनी छत्रपती संभाजीनगरमध्ये येऊन चर्चा करावी अशी मनोज जरांगे यांची इच्छा आहे. मात्र उद्या साता-यात छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिवकालीन वाघनखं येणार असल्याने शंभूराज देसाई व्यस्त आहेत. शनिवारी मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसणार आहेत. त्यामुळे चर्चेला वेळ लागत आहे असे आमदार राजेंद्र राऊत म्हणाले.
उद्या मुख्यमंत्र्यांची भेट घेणार
मनोज जरांगे यांच्याशी चर्चा झाली आहे. मी उद्या मुख्यमंत्री एकनाथ श्ािंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे.