पुणे : वादग्रस्त ट्रेनी आयएएस पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरला गुरुवार दि. १८ जुलै रोजी साकाळी पुणे ग्रामीण पोलिसांनी महाडमधून अटक केली. स्थानिक पोलिस ठाण्यात नोंद करुन पोलिस तिला पुण्याला घेऊन आले. त्यानंतर सर्व प्रक्रिया पुर्ण करून तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. त्यानंतर पोलिसांनी मनोरमा खेडकरला कोर्टात हजर केले होते. पोलिसांनी कोर्टात मनोरमा खेडकरला ७ दिवसांची पोलिस कोठडी द्यावी अशी मागणी केली असता कोर्टाने मात्र मनोरमा खेडकरला तीन दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मनोरमा खेडकरचे काही दिवसांपूर्वी स्थानिक शेतक-यांना धमकावतानाचे फोटो आणि व्हीडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते. पुणे पोलिसांशी देखील तिने हुज्जत घातली होती. गेल्या काही दिवसांपासून मनोरमा खेडकरचा तपास पोलिस करत होते. आज अखेर पोलिसांनी मनोरमा खेडकरला महाडमधील हॉटेलमधून अटक केली आहे. स्थानिक पोलिस ठाण्यात नोंद करुन पोलिस त्यांना पुण्याला घेऊन आले. त्यानंतर सर्व प्रक्रिया पुर्ण करून तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. त्यानंतर कोर्टात पोलिसांनी मनोरमा खेडकरला ७ दिवसांची पोलिस कोठडी द्यावी अशी मागणी केलेली होती. मात्र, कोर्टाने मनोरमा खेडकरला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मनोरमांवर जीवे मारण्याचा गुन्हा
मनोरमा खेडकरवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे कलम ३०७ वाढवण्यात आले आहे. आधी फक्त शेतक-यांना धमकावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. नवीन कलम वाढ झाल्यामुळे मनोरमा खेडकरच्या अडचणीत वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता या संपूर्ण प्रकरणामध्ये आता मनोरमा खेडकरच्या अडचणी वाढल्या आहेत.
पती दिलीप खेडकर फरार
मनोरमा खेडकरसोबत तिचे पती दिलीप खेडकर यांच्यावरती देखील गुन्हा दाखल आहे, मात्र ते देखील गायब आहेत त्यांचाही पोलिस शोध घेत आहेत. त्यांच्याबाबतची माहिती पोलिसांना हवी आहे. तर शेतक-यांना धमकावताना वापरलेले पिस्तुल कुठून आले आहे, त्याची माहिती देखील पोलिसांना हवी आहे. त्याचबरोबर मुळशी तालुक्यामध्ये खेडकर कुटुंबाची नेमकी किती जमीन आहे यासह इतर माहिती पोलिस घेणार आहेत.