27.2 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeछत्रपती संभाजीनगरमराठा आरक्षण ओबीसीतूनच घेणार

मराठा आरक्षण ओबीसीतूनच घेणार

पहिल्या घोंगडी बैठकीतून जरांगेचा एल्गार सरकारच्या सतरा पिढ्या आडव्या आल्या तरी जुमानणार नाही

बीड : भुजबळ आणि फडणवीसांच्या सतरा पिढ्या आडव्या येऊ द्या, काही फरक पडत नाही. मराठ्यांना संघर्ष काही नवीन नाही. मराठ्यांची एकजूट अशीच राहू द्या, सावध राहा, मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण घेऊन दाखवू, असा कडक इशारा मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील बीडच्या गेवराईतील पहिल्याच घोंगडी बैठकीतून इशारा दिला आहे.

सकल मराठा समाजच्या मागण्याकडे सरकारकडून दुर्लक्ष होत असल्याने मराठा योध्दा मनोज जरांगयांनी विधानसभा निहाय घोंगडी बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे. आज गुरुवारी गेवराईच्या पवार-पंडिताच्या मतदार संघात पहिली बैठक घेण्यात आली. याप्रसंगी जरांगे बोलत होते. मराठा आरक्षण कृती समीतीच्या समन्वयकांनी गेवराई शहरातील दसरा मैदानावर घोंगडी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मनोज जरांगे म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांना सांगा मराठ्यांना आरक्षण द्या, आडवे येऊ नका.

नाहीतर तुम्ही कितीही प्लॅनिंग केली तरी आम्ही तुमचा डाव हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही. माझ्या समाजाला न्याय मिळाला नाही तर तुमचे ११३ आमदार पडल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला सत्ता हवी असेल तर आरक्षण द्या, समाज आता आरक्षण मिळाल्याशिवाय माघार घेणार नाही. तकलादू योजना कशाला देता. जे कायम राहणार आहे ते द्या, नाटके करू नका.

तिन्ही गॅजेट आता उपलब्ध
सातारा, मुंबई, हैद्राबाद हे तिन्ही गॅजेट आता उपलब्ध झाले आहेत. असे असताना, राज्य सरकार मराठा समाजावर अन्याय अत्याचार करीत आहे. असा आरोप ही त्यांनी केला. पाटील म्हणाले, माझ्या समाजाचे कल्याण तुम्हाला बघवत नाही का? तुम्हाला निर्णय घ्यायचा नसेल तर आम्ही बघून घेऊ, तुमचा एक आमदार निवडून येणार नाही.

आता आम्ही ठरवू
आता, पाडायचे की आणायचे आम्ही ठरवू, मराठा समाजाचा एक ही उमेदवार पडणार नाही, या दृष्टिकोनातून मराठा समाजाने दिलेला उमेदवार निवडून आणू, असे सांगून, ते म्हणाले, पावसाने झालेल्या नुकसणीबाबत थेट कृषीमंत्री यांना कॉल केला. माझ्या शेतकरी बांधवांना मदत करा, अशी मागणी केली अन ते आता बोलून गेले की सरसकट मदत करतो.

मी शब्दात पकडणारा माणूस
आता त्यांनी मला शब्द दिलाय आता त्यांना चांगले माहितीय मी शब्दात पकडणारा माणूस आहे. आता त्यांना सरसकटच मदत द्यावी लागणार, हे लक्षात ठेवा. ती सर्व मदत आठवड्यात द्या, नसता रस्त्यावरची लढाई शेतक-यांना सोबत घेऊन लढणार, असा इशारा ही मराठा योद्धा मनोज जरांगे यांनी शेवटी बोलताना दिला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR