20.9 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeमहाराष्ट्रमराठवाड्याला पाणीटंचाईचे चटके

मराठवाड्याला पाणीटंचाईचे चटके

मार्चमध्येच टँकरचा आकडा ४५० पार

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात मार्च महिन्याच्या दुस-या आठवड्यात टँकरचा आकडा ४५० पार गेला आहे. विभागाला पाणीटंचाईचे चटके जाणवत असून, तहानलेल्या गावांना पाणीपुरवठा करणा-या टँकरची संख्या वाढू लागली आहे. मार्चअखेर ५०० पर्यंत टँकरचा आकडा जाणे शक्य आहे.

छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर जिल्ह्यांत पाणीटंचाई जाणवत असून, परभणी, हिंगोली, नांदेड व धाराशिव हे जिल्हे अद्याप टँकरमुक्त आहेत. १५ दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड जिल्ह्यातील मिळून एकूण १९७ गावे, ५८ वाड्यांना ३१९ टँकरद्वारे पाणी केला जात होता, तर सध्या लातूरसह या जिल्ह्यातील एकूण २७६ गावे, ७८ वाड्यांना ४५० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

जालना जिल्ह्यात परतूर तालुका टँकरमुक्त असून, उर्वरित तालुक्यातील एकूण १०५ गावे व ३९ वाड्यांतील ग्रामस्थांना १७८ टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा होत आहे. भोकरदन तालुक्यात ४३ टँकर सुरू आहेत, तर जालना तालुक्यात पाणीपुरवठा करणा-या टँकरची संख्या ४०च्या घरात आहे, तर बीड तालुक्यातील गेवराई तालुक्यातील १ गाव ३ वाड्यांना २ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील एका गावात एका टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे.

जिल्ह्यात २६९ टँकरनी पाणी…
मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये २६९ टँकरनी पाणीपुरवठा सुरू आहे. खुलताबाद, सोयगाव हे तालुके वगळता सर्व तालुक्यांत टँकर सुरू आहेत. पैठण तालुक्यात जायकवाडी धरण असताना देखील ३५ गावे व ८ वाड्यांना सध्या ४७ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील ३८ गावे व १२ वाड्यांना मिळून ४८ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR