22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeछत्रपती संभाजीनगरबाप्पांच्या स्वागतासाठी बाजारपेठा सजल्या!

बाप्पांच्या स्वागतासाठी बाजारपेठा सजल्या!

कृत्रिम फुलांच्या माळांना मोठी मागणी बाजारात गर्दीने आणले नवचैतन्य

छत्रपती संभाजीनगर : गणरायाच्या सजावटीसाठी लागणा-या वेगवेगळ्या आकर्षक वस्तूंनी बाजारपेठा भरून गेल्या आहेत. हॅण्डमेड गणपती मखर, वूलन गणपतीसह कळस, तोरण, मोरला, गणेशभक्तांची चांगलीच पसंती दिसून येत आहे. गणपतीची आरास सजविण्यासाठी रंगीबेरंगी लायंिटगला चांगलीच मागणी दिसून येत आहे. सजावटीसाठी नेहमी वेगवेगळ्या लायंिटगच्या माळा बाजारात असतात. यंदा बाजारात मल्टिकलरची एलईडी लायटिंग, स्पॉट लाइट, झुंबरचे नवनवीन प्रकार पाहायला मिळत आहेत. या वस्तू खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी वाढलेली आहे.

सजावटीचे साहित्य घेण्यासाठी बाजारात गणेशभक्तांची गर्दी झालेली दिसत आहे. गुलमंडी केळीबाजार, औरंगपुरा, टीव्ही सेंटर, गजानन महाराज मंदिर परिसर, टीव्ही सेंटर परिसरात गणपतीची आरास सजविण्यासाठी आकर्षित माळा, लटकन, तोरणपट्टी, दिवा स्टॅण्ड प्रिंटेड कापड, कपड्याचे तोरण, कपड्यांची फुले, मोती माळा, फुलांच्या कपड्याच्या माळा, गोटाबॉल, मोतीबॉल, नेट क्लॉथ डेकोरेशन विक्रीसाठी आले आहेत. सिटी चौक परिसरात दुकानांमध्ये विविध रंगांच्या आकर्षक लायंिटग, झुंबर, फोकस वस्तूंनी दुकाने सजलेली आहेत. गणरायाच्या सजावटीसाठी वॉटरप्रूफ एलईडी लायटिंगदेखील बाजारात उपलब्ध आहेत.

पावसात ओली झाल्यावरदेखील ही लायटिंग खराब होत नसून सुरक्षितदेखील असल्याने या लायंिटगला मागणी आहे. याचे ४० मीटरचे बंडल १,२५० रुपयांना मिळत आहे. हॅण्डमेड गणपती मखरला चांगलीच मागणी आहे. राज्यात पुणे, मुंबईसह विदेशात दुबईपर्यंत चांगली मागणी राहते. राज्यातही चांगल्या प्रकारे मागणी होते. किंमत जास्त असली, तरी दोन-तीन वर्षे हॅण्डमेड गणपती मखर वापरू शकतात. त्यामुळे भक्तांची त्याला जास्त मागणी आहे. यंदा दरांमध्ये १० ते २० टक्के वाढ झाली आहे. फुलांच्या माळा, सोनेरी मोती माळा, क्रिस्टल माळा, मोती माळा, कपडा माळा, प्रिंटेड कपडे, कपड्याच्या तोरणाला ग्राहकांची चांगलीच मागणी आहे. यंदा २० ते ३० टक्के दरांमध्ये वाढ झाली आहे.

मखर, मंडपाचे दर वाढले
हॅण्डमेड गणपती मखर १२०० ते ४००० हजार रुपयांपर्यंत, झुंबर जोडी १०० ते १२०, फ्लॉवर ५ ते ४० रुपये, नेट क्लॉथ डेकोरेशन ३० ते ५० रुपये मीटर, मोतीबॉल १०० ते २०० रुपये पाकीट, शुभ-लाभ १०० ते २०० रुपये, लटकन १०० ते ५०० रुपये जोडी, तोरणपट्टी ५० ते १०० रुपयांपर्यंत, सोनेरी मोती माळा ३००, क्रिस्टल मोती माळा ५०० रुपये जोडी, कपडा माळा ३०० ते ५०० रुपये, कापड फुले ४० ते ५० रुपये डझन, कापड दहाफुटी तोरण ७०० ते ८०० रुपये अशा दराने विक्री होत आहेत.

महागाईतही बाप्पासाठी तडजोड नाही
महागाई प्रचंड वाढली असतानाही आपल्या लाडक्या बाप्पांसाठी भाविक भक्त कोणतीही तडजोड करीत नसल्याचे दिसून येत आहे. मखरातील जगमगाटासाठी लागणारी साधी लायटिंग ८० रुपये, (१२ मीटर लांब), सिंगल कलर लायटिंग १०० रुपये, मल्टी कलर लायटिंग ३०० रुपये ते ६०० रुपये (३० ते ३०० फूट), लहान स्पॉट लाइट सिंगल कलर ८० रुपये, मल्टिकलर स्पॉट लाइट १०० ते १५० रुपये, झुंबर १०० रुपये ते ७०० रुपये.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR