23.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeराष्ट्रीयउत्तर प्रदेशात सामूहिक हत्याकांड

उत्तर प्रदेशात सामूहिक हत्याकांड

सख्ख्या भावाने संपविले भावाचे अख्खे कुटुंब

सीतापूर : उत्तर प्रदेशात नुकतेच भीषण सामूहिक हत्याकांड उघडकीस आले आहे. या प्रकरणात एकाच कुटुंबातील सहा व्यक्तींची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. खरे तर आरोपीला एकाच व्यक्तीची हत्या करायची होती. पण पुरावे नष्ट करण्यासाठी एकामागोमाग एक सहा जणांची हत्या केली.

उत्तर प्रदेशातील सीतापूरमधील पाल्हापूर या छोट्याशा गावात ११ आणि १२ मेदरम्यान रात्रीच्या वेळी एका घरात मृत्यूचे तांडव पाहायला मिळाले. या घरात राहणा-या एकाच कुटुंबातील सहा जणांची निर्घृण हत्या करण्यात आली. मृतांमध्ये घरातील प्रमुख व्यक्ती, त्याची पत्नी, आई आणि तीन लहान मुलांचा समावेश आहे.

या कुटुंबातील एकमेव जिवंत राहिलेली व्यक्ती अजित सिंहने त्याचा भाऊ अनुराग सिंह, त्याची पत्नी-मुलांसह आईची हत्या केली. पोलिस तपासात, मारेक-याला एकाच व्यक्तीची हत्या करायची होती. पण हत्या करताना घरात झोपलेली दुसरी व्यक्ती जागी झाली. त्यामुळे त्या व्यक्तीची हत्या करावी लागली. पण दोन जणांची हत्या केल्यावर, मारेक-याने विचार केला की तिस-या व्यक्तीला सोडून का द्यायचं. म्हणून त्याने तिस-या व्यक्तीवर सुद्धा गोळी झाडली. तिसरी हत्या करतेवेळी घरात झोपलेली १२ वर्षांची लहान मुलगी जागी झाली. तिने तिच्या आई, आजी आणि वडिलांची हत्या होताना पाहिलं. तिने मारेक-याला ओळखले. त्यामुळे पुरावा नष्ट करण्यासाठी मारेक-याने त्या मुलीवर गोळी झाडून तिची हत्या केली. त्यानंतर मारेक-याने एका मुलीला मारले आहे, तर अन्य दोन मुलांना का सोडायचं, असा विचार केला. त्यानंतर त्याने दोन्ही मुलांच्या डोक्यावर हातोड्याने घाव घातले आणि एक-एक करून तिन्ही मुलांना घराच्या छतावरून खाली ढकलून दिल्याचे निष्पन्न झाले. या हत्याकांडाच्या तपासात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या.

हे हत्याकांड बंदुकीच्या एका गोळीमुळे उघडकीस आले. ही गोळी मारेक-याला एका व्यक्तीवर झाडायची होती. पण प्रत्यक्षात ती एक लक्ष्य भेदून आणखी एका व्यक्तीच्या शरीरात घुसली. याचा अर्थ ही गोळी झाडली एकावर पण दुस-याच व्यक्तीच्या शरीरात सापडली. या हत्याकांडात मृत झालेल्या अनुराग सिंह यांचा शवविच्छेदन अहवाल आला तेव्हा स्पष्ट झाले की त्यांच्या डोक्यात एक नाहीतर दोन गोळ्या लागल्या होत्या. ज्या अनुरागवर कुटुंबीयांची हत्या करून स्वत: आत्महत्या केल्याचा आरोप होता. तो स्वत:च मारेक-याचे लक्ष्य ठरला होता. कारण डोक्यात दोन गोळ्या लागणे याचा अर्थ आत्महत्या होत नाही. पण आता असा प्रश्न पडतो की, ज्या व्यक्तीने घरात घुसून सहा जणांची हत्या केली, त्याला अनुरागचा मृत्यू आत्महत्या म्हणून
दाखवायचा असेल तर त्याच्या डोक्यात दोन गोळ्या का झाडल्या?

अनुरागच्या १२ वर्षाच्या मुलीची हत्या करण्यासाठी तिच्या डोक्यात जी गोळी झाडली, ती गोळी तिच्या गळ्यातून आरपार गेली. ही गोळी पुन्हा अनुरागच्या डोक्यात घुसली आणि ती डोक्यातच अडकून राहिली. शवविच्छेदनावेळी ही गोळी बाहेर काढली गेली. या दुस-या गोळीने हत्याकांडाचे गूढ उकलले. यावरून हे प्रकरण पाच हत्या केल्यावर आत्महत्या केल्याचे नसून सहा जणांची हत्या केल्याचे स्पष्ट झाले. अनुरागच्या पूर्ण कुटुंबासह आईची हत्या दुसरी कोणी नाहीतर त्याचा भाऊ अजितने केली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR