23.3 C
Latur
Sunday, July 14, 2024
Homeमहाराष्ट्रवसईतील मिक्सर कारखान्याला भीषण आग

वसईतील मिक्सर कारखान्याला भीषण आग

मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक

वसई : वसई पूर्वेच्या कामण जाधववाडी येथे मिक्सर कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. मंगळवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. वसई पूर्वेच्या कामण भागातील जाधववाडी परिसरात मिक्सर तयार करणारा जेपान कारखाना आहे.

या कारखान्यात मंगळवारी पहाटेच्या सुमारास अचानकपणे आग लागली आहे. या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात खळबळ उडाली आहे. याची माहिती येथील स्थानिक नागरिकांनी वसई-विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाला दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू आहे.

कारखान्यात मिक्सर तयार करण्यासाठी असलेले साहित्य व इतर कच्चा माल असल्याने आगीची तीव्रता अधिक वाढली आहे. नेमकी आग कोणत्या कारणामुळे लागली याचे कारण समजू शकले नसून आगीत कारखान्यातील साहित्य जळून खाक झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पोलिस, अग्निशमन दल व स्थानिक नागरिक यांच्यामार्फत घटनास्थळी परिस्थिती नियंत्रात आणण्याचे काम सुरू आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR