31.9 C
Latur
Thursday, May 30, 2024
Homeराष्ट्रीयरायपूर वीज कार्यालयाला भीषण आग

रायपूर वीज कार्यालयाला भीषण आग

रायपूर : छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये एक मोठी दुर्घटना घडली. येथील वीज विभागाच्या सब-डिव्हिजन ऑफिसमध्ये भीषण आग लागली. आग इतकी भीषण आहे की काही किलोमीटर दूर धुराचे लोट दिसत आहेत. आग लागल्यानंतर आजूबाजूचे लोक जीव वाचवण्यासाठी पळताना दिसले. या घटनेची माहिती तातडीने स्थानिक पोलिस आणि अग्निशमन दलाला देण्यात आली आहे.

गुढियारी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही भयंकर घटना घडली आहे. येथे विद्युत विभागाच्या उपविभागीय कार्यालयातील ट्रान्सफॉर्मरमध्ये शॉर्टसर्किट होऊन भीषण आग लागली. काही वेळातच आगीने उग्र रूप धारण केले आणि आजूबाजूच्या परिसरात धुराचे साम्राज्य पाहायला मिळाले. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आणि आग विझवण्याचे काम सुरू केले आहे.

ट्रान्सफॉर्मरमधील ऑईल बॅरलमध्ये सतत स्फोट होत असल्याने शेजारच्या परिसरातील लोक घाबरले आणि जीव वाचवण्यासाठी पळू लागले आहेत. परिस्थिती पाहून पोलिसांनी उपविभाग कार्यालयाभोवतीचे रस्ते बंद केले. आग सतत वाढत आहे. त्यामुळे अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडचणी सामना करावा लागत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR