22.4 C
Latur
Tuesday, July 23, 2024
Homeसोलापूरजन्मोजन्मी हाच पती मिळू दे; सुवासिनींची वटपोर्णिमा उत्साहात

जन्मोजन्मी हाच पती मिळू दे; सुवासिनींची वटपोर्णिमा उत्साहात

सोलापूर- सोलापूर शहर जिल्ह्यात वटपौर्णिमेचा उत्साहात झाला. शहरातील विविध ठिकाणी वटपौर्णिमा सण मोठ्या उत्साहात भक्तीभावाने संपन्न झाला. सकाळी ८ वाजल्यापासूनच असंख्य सुवासिनी महिलांनी अपार श्रद्धेने वटवृक्षाची वडपूजा करून हा सण साजरा केला. वटवृक्षाची पूजा करण्यासाठी सुवासिनी महिला शहरातील अनप्पा कडादी प्रशाला, अरविंद धाम, रुपा भवानी, आदी ठिकाणी दाखल झाल्या होत्या.

दरम्यान वटपौर्णिमेला धार्मिक ऐतिहासिक महत्व असल्याने दरवर्षी वटपौर्णिमेच्या दिवशी वडपुजेसाठी असंख्य महिला भक्त गर्दी करून वटसावित्रीने सुरु केलेली ही वडपूजा परंपरेप्रमाणे दरवर्षी साजरी करतात. वडपूजा करण्यासाठी स्थानिक महिलांबरोबरच परगावाहून आलेल्या महिलांची संख्या लक्षणीय आसते.दरम्यान वटवृक्ष पूजन संपन्न केल्यानंतर सुवासिनी महिलांनी सोभाग्याचे लेण असणारे हळदी कुंकू कपाळा लावून गहू आंबा वस्तूंनी एकमेकांची ओटी भरली. यावेळी शहरातील सारे वातावरण चैतन्यमय आणि धार्मिक झालेले होते. याठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR