27.6 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeक्रीडासचिनचे गुरू आचरेकर यांचा मुंबईत होणार स्मारक;राज्य सरकारचा निर्णय

सचिनचे गुरू आचरेकर यांचा मुंबईत होणार स्मारक;राज्य सरकारचा निर्णय

मुंबई : भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरचे प्रशिक्षक दिवंगत रमाकांत आचरेकर यांचा मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये स्मारक उभारले जाणार आहे. आचरेकरांना शिवाजी पार्कची विशेष आवड होती. यामुळे त्याचा पुतळा या ठिकाणी बणवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, रमाकांत आचरेकर यांचे स्मारक उभारण्यासाठीच्या प्रस्तावाला मंजूरी ही दिली आहे. आचरेकर केवळ सचिनचेच गुरू नव्हते तर त्यांनी प्रवीण आमरे, विनोद कांबळी आणि चंद्रकांत पंडित यांसारख्या इतर अनेक खेळाडूंना क्रिकेट प्रशिक्षण देऊन घडवले आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरला जागतिक क्रिकेटचा राजा आणि क्रिकेटचा देव बनवण्यात त्यांचे गुरू रमाकांत आचरेकर यांचे महत्त्वाचे योगदान होते. रमाकांत आचरेकर यांनी लहानपणापासूनच त्याची प्रतिभा ओळखली होती आणि रमाकांत आचरेकर यांनी सचिन तेंडुलकरला अव्वल दर्जाचा फलंदाज घडवण्यास कठोर परिश्रम घेतले होते. आता महाराष्ट्र सरकारने द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्या प्रशिक्षकांच्या स्मरणार्थ स्मारक बांधण्यास मान्यता दिली आहे. सर्वोत्तम प्रशिक्षकांपैकी एक असलेल्या आचरेकर यांचे २ जानेवारी २०१९ रोजी मुंबईत निधन झाले होते.

सचिनने व्यक्त केला आनंद
दरम्यान, भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरने राज्य सरकारच्या या निर्णयाबाबत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये तेंडुलकर म्हणाला की, आचरेकर सरांचा माज्या आणि इतर अनेकांच्या आयुष्यावर खूप प्रभाव आहे. मी त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने बोलतो. त्यांचे आयुष्य शिवाजी पार्कमधील क्रिकेटभोवती फिरले. शिवाजी पार्कमध्ये नेहमीच राहण्याची त्यांची इच्छा असायची. आचरेकर सरांचा पुतळा शिवाजी पार्कमध्ये उभारण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे मला खूप आनंद झाला आहे. असे सचिनने सोशल मीडियावर पोस्ट करून म्हटले आहे.
 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR