30.3 C
Latur
Friday, April 4, 2025
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रात महिलांपेक्षा पुरुष अधिक तणावाखाली

महाराष्ट्रात महिलांपेक्षा पुरुष अधिक तणावाखाली

टेलिमानसवर कोल्हापुरातील पुरुषांचे मदतीसाठी सर्वांत जास्त कॉल महिलांकडून पुरुषांवरील अत्याचारात वाढ

मुंबई : पुरुष व्यक्त होत नाही किंवा स्वत:च्या मनातील घालमेल सांगत नाही. यामुळे राज्यात महिलांच्या तुलनेत महाराष्ट्रात पुरुषांच्या नैराशाचे प्रमाण वाढले असून महिलांकडूनही पुरुषांच्या अत्याचारात वाढ झाली आहे.

मानसिक आरोग्यासंदर्भातील समस्या सोडवण्यासाठी आरोग्य विभागाने सुरू केलेल्या टेलिमानस हेल्पलाईनची आकडेवारी समोर आली आहे. आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील पुरुष महिलांपेक्षा अधिक नैराश्यात असल्याचे समोर आले आहे. टेलिमानसच्या हेल्पलाईन मदतीसाठी येणारे कॉल हे महिलांपेक्षा दुप्पट पुरुषांचे असल्याचे समोर आले आहे.

राज्यात मदतीसाठी टेलिमानसच्या हेल्पलाईन ६७.९९ टक्के कॉल पुरुषांचे असून ३१. ५० टक्के कॉल हे महिलांचे असल्याचे समोर आले आहे. ०.०१२ टक्का पारलिंगी व्यक्तींनीही या संपर्क केलेल्यांमध्ये समावेश आहे. टेलिमानस या हेल्पलाइनवर मदतीसाठी आलेल्या कॉल्सपैकी ७१ टक्के कॉल हे १८ ते ४५ या वयोगटातील व्यक्तींचे आहेत. तर ४६ ते ६४ टक्के वयोगटातील १६.४ टक्के लोकांनी मदतीसाठी संपर्क साधला. यापैकी १० पैकी सात पुरुषांनी तर तीन महिलांनी मानसिक आरोग्यासंदर्भात मदत मागितली आहे. नैराश्य, अस्वस्थता, चिंता, एकटेपणा झोपेच्या तक्रारी यासाठी काय करावे याबाबत विचारणा करण्यासाठी फोन करण्यात आले आहेत.

कामाच्या ठिकाणी ताण वाढला
कामाच्या ठिकाणी असलेला ताण, बिघडलेल्या नातेसंबंधाच्या तक्रारी या प्रकरणाची संख्या यामध्ये सर्वाधिक वाढलेली दिसून येत आहे. चिंता, ताणतणाव, नैराश्य, नातेसंबंध, कामाचा ताणतणाव, चिडचिडेपणा, एकटेपणा, वर्तणुकीतील बदल, झोप न येणे, अतिविचार, व्यसनाधीनता या समस्यांसाठी सर्वाधिक फोन येत असल्याचे सांगण्यात आले आहे.

पुणे दुस-या तर मुंबई तिस-यास्थानी
नैराश्येसंदर्भातील समुपदेशनासाठी सर्वाधिक कॉल हे कोल्हापूर जिल्ह्यातून आले आहेत. तर मुंबई तिस-या क्रमाकांवर असून पुणे शहर दुस-या क्रमांकावर आहे.

मदतीसाठी दिड लाखांहून अधिक कॉल्स
आतापर्यंत राज्यभरातून १ लाख ४५ हजार ४३१ फोन टेलिमानस आले आहेत. त्यापैकी ८५ हजार ६५० कॉल पैकी ८७.८६ टक्के व्यक्तींनी मदतीसाठी विचारणा केली. तर आपत्कालीन परिस्थितीमध्ये ०.९७३ टक्के व्यक्तींनी फोन केल्याचे समोर आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR