32.4 C
Latur
Tuesday, February 27, 2024
Homeसोलापूरमतिमंद निवासी शाळा खांडवीचे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धामध्ये यश

मतिमंद निवासी शाळा खांडवीचे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धामध्ये यश

बार्शी — जिल्हा समाज कल्याण कार्यालय जिल्हा परिषद सोलापूर मार्फत जागतिक दिव्यांग दिना निमित्त घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा मध्ये राजीव स्मृती बहुउद्देशीय संस्था बार्शी संचलित मतिमंद निवासी शाळा खांडवी येथील वीस विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता सदर क्रीडा स्पर्धेमध्ये 100 मीटर धावणे, 200 मीटर धावणे, गोळा फेक, लांब उडी, बादलीत बॉल टाकने, लगोर फोडणे, स्पॉट जंप या क्रीडा प्रकारात 1 गोल्ड पदक, 3 सिल्वर पदक, 9 कास्य पदकाची कमाई केली,

यामध्ये (अस्मिता येरवडे -प्रथम क्रमांक 200 मीटर धावणे),(सृष्टी जावळे- द्वितीय क्रमांक स्पॉट जंप) (प्रतीक्षा मुचुंडे -द्वितीय क्रमांक- 100 मीटर धावणे),(धनश्री गंभीरे -द्वितीय क्रमांक 25 मीटर चालणे), (प्रीती मुचुंडे-तृतीय क्रमांक 50 मिटर धावणे) (श्रुती जावळे-तृतीय क्रमांक 100 मिटर धावणे),(सुट्टी जावळे -तृतीय क्रमांक 100 मिटर धावणे)(अस्मिता येरवडे-तृतीय क्रमांक 100 मिटर धावणे), (हुजेफा तांबोळी-तृतीय क्रमांक 25 मीटर चालणे),(प्रीती मुचुंडे-तृतीय क्रमांक गोळा फेक), (अरमान मुलानी-तृतीय क्रमांक गोळा फेक),(धनाजी सागर-तृतीय क्रमांक लांब उडी)(धनश्री गंभीरे-तृतीय क्रमांक लगोर फोडणे.) या विद्यार्थ्यांनी यश मिळवले शाळेच्या या यशाबद्दल संस्थेचे अक्ष अरुण बारबोले तसेच मुख्याध्यापक सचिन पवार यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विशेष शिक्षक सुनील काळे कलाशिक्षिका श्रीमती कविता कोळगे शाळेचे इतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR