परभणी : शहरातील चिंतामणी इंटरनॅशनल स्कूलच्या वार्षिक स्रेह संमेलनात विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण लीलाचे उत्कृष्ट सादरीकरण केले. ज्यामध्ये श्रीकृष्ण जन्म, पुतणा वध, कालिया मर्दन प्रसंग, कंस वध, कृष्ण सुदामा भेट, अर्जुन स्वयंवर, सारीपटाचा खेळ, द्रौपदी वस्त्रहरण, कौरव पांडवांचे युद्ध असे विविध प्रसंगाचे सादरीकरण करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी दीपक देशमुख, शिवसेना नेते आनंद भरोसे, प्रा. मोडक, चिंतामणी शाळेचे संस्थापक अध्यक्ष ऍड. किरण दैठणकर, मुख्याध्यापिका सुचेता दैठणकर, अंजली बाबर, प्रिया ठाकूर, महेंद्र मोताफळे, सौ. देसरडा आदिंची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी ऍड. दैठणकर म्हणाले की, आजच्या पिढीला आपल्या संस्कृतीची माहिती झाली पाहिजे या उद्देशाने आम्ही स्रेह संमेलनाच्या माध्यमातून श्रीकृष्ण लीलाचे विद्यार्थ्यांना महत्व पटवून दिले. या कार्यक्रमास पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यशस्वितेसाठी सर्व शिक्षकवृंदानी परिश्रम घेतले.