28.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeराष्ट्रीययूएई, पाक नागरिकांनाही ‘विकसित भारत’चे मेसेज

यूएई, पाक नागरिकांनाही ‘विकसित भारत’चे मेसेज

काँग्रेस आक्रमक, सर्व प्रकार बेकायदेशीर भाजपला त्यांचे नंबर कुठून मिळाले?

इस्लामाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्रासह विकसित भारत संपर्कसाठी जनतेचा अभिप्राय आणि सूचना मागविणा-या व्हॉट्सअ‍ॅप मेसेजेसनी अलीकडच्या काही दिवसांत वाद निर्माण केला आहे. देशातील विरोध पक्षांनी हा सर्व प्रकार बेकायदेशीर आणि आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणारा असल्याचा आरोप केला आहे.

दरम्यान, मोदी सरकारच्या विकसित भारत संपर्कचे मेसेजेस यूएई आणि पाकिस्तानसह विविध देशातील नागरिकांना जात आहेत. आता यावरुन एक नवीन वाद निर्माण झाला आहे. ज्या परदेशी नागरिकांना हे मेसेजेस जात आहेत. त्यांनी, भाजपला आमचे फोन नंबर कसे मिळाले असा प्रश्न उपस्थित केला आहे. या दरम्यान, काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये शरूर यांनी अँथनी जे परमल नावाच्या व्यक्तीने केलेल्या लिंक्डइन पोस्टचे स्क्रीनशॉट आणि त्यांच्या पोस्टच्या खालील कमेंट्सचे स्क्रीनशॉट्स शेअर केले.

अँथनी यांनी विकसित भारत संपर्क व्हॉट्सअ‍ॅप मेसेज स्क्रीनशॉट शेअर केला आणि लिहिले काल यूएईमध्ये राहाणा-या अनेक परदेशी नागरिकांना भारतीय पंतप्रधान मोदींचा वैयक्तिक व्हॉट्सअ‍ॅप मेसेज प्राप्त झाला, जो परदेशातील भारतीयांना उद्देशून होता, ज्याचे वर्णन निंदनीय म्हणून केले जाऊ शकते. कारण अशा प्रकारचे मेसेजेस गोपनीयता कायदे आणि शिष्टाचारांचे उल्लंघन.

स्पॅम होऊ शकतो?
भाजप आणि भारत सरकारने आमचा मोबाइल क्रमांक कसा मिळवला? आणि हजारोंच्या संख्येने गैर-भारतीयांना ते उघडपणे कसे स्पॅम करू शकतात? नैतिक सरकारसाठी इतके आहे असा सवाल त्यांनी केला. अँथनी यांच्या पोस्ट खालील कमेंट्समध्ये अनेक गैर-भारतीयांना विकसित भारत संपर्कबाबत असे मेसेजेस आल्याचे उघड झाले आहे.

भारतीय डेटाचा गैरवापर : थरूर
थरूर यांनी पोस्ट आणि कमेंट्स शेअर करत वर लिहिले, सत्ताधारी पक्षाच्या राजकीय हितासाठी सरकारी यंत्रणा आणि सरकारी डेटाच्या अशा उघड गैरवापराची दखल घेईल का? अमेरिकेत राहणारे पाकिस्तानी नागरिक उझैर युनूस यांनीही त्यांना विकसित भारत बाबत आलेला अनुभव एक्सवर शेअर केला. पाकिस्तान आणि यूएईमध्ये असलेल्या पाकिस्तानी मित्रांना यांचा विकसित भारत संपर्कचा व्हॉट्सअ‍ॅप मेसेज मिळत असल्याचे दिसत आहे असे युनूसने एक्स वर लिहिले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR