नवी दिल्ली : मायक्रोसॉफ्ट कंपनीचे भारतीय वंशाचे सीईओ सत्या नडेला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मायक्रोसॉफ्ट भारतात तीन अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार असल्याची घोषणाही केली. तसेच १ कोटी तरुणांना एआयसाठी प्रशिक्षित करणार असल्याचेही ते म्हणाले. बजेटपूर्वीच मोठ्या गुंतवणुकीची घोषणा झाल्याने बाजारात आनंदाची उसळी येण्याची शक्यता आहे.
नवी दिल्लीत नडेला यांनी मोदींची भेट घेतली. यावेळी त्यांनी कंपनीच्या विस्तार आणि गुंतवणुकीबाबत माहिती दिली. यामध्ये एआय, क्लाऊड सर्व्हिसपासून ते विविध अविष्काराचा समावेश आहे. सोमवारी ही भेट झाली. याची माहिती नडेला यांनी एक्सवर दिली आहे. नडेला यांनी आज याची माहिती देत भारतात मायक्रोसॉफ्ट तीन अब्ज डॉलर्स एवढी प्रचंड गुंतवणूक करणार असल्याचीही घोषणा केली. मायक्रोसॉफ्ट २०३० पर्यंत भारतातील सुमारे १ कोटी लोकांना अक कौशल्य विकास प्रशिक्षण देणार असल्याचेही ते म्हणाले.