नाशिक : भारतीय वायू दलाच्या विमानाला अपघात झाल्याची घटना घडली आहे. नाशिकमध्ये वायूदलाचे विमान दुर्घटनाग्रस्त झाले आहे. वायूदलाचे मिग विमान कोसळल्याची महत्त्वाची बातमी आहे. नाशिकच्या पिंपळगावजवळ शिरसगाव परिसरात मिग विमान कोसळलं आहे. वायू दलाचे विमान कोसळण्यामागचं नेमकं कारण काय, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
वायू दलाचे विमान नाशिकमध्ये दुर्घटनाग्रस्त झाले. वायूदलाच्या मिग विमानाचा भीषण अपघात झाला. मिग विमान कोसळले, विमानाचे तुकडे-तुकडे झाले आणि त्यानं पेट घेतला. दरम्यान, या दुर्घटनेत सुदैवाने पायलट बचावले आहेत. पायलट पॅराशुटच्या साहाय्याने विमानाबाहेर पडल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या अपघाताचे नेमके कारण काय हे शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे.