27.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeसोलापूरचंद्रभागा नदीकाठच्या झोपडपट्टीधारकांचे स्थलांतर

चंद्रभागा नदीकाठच्या झोपडपट्टीधारकांचे स्थलांतर

पंढरपूर : उजनी व वीर धरण पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाल्याने भीमा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले आहे. बाढणारा पाण्याचा विसर्ग लक्षात घेता, नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहावे म्हणून पंढरपूर नगरपालिका प्रशासन, महसूल व पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. वारंवार सूचना देण्यात येत आहेत. नदीपात्रालगतच्या व्यास नारायण झोपडपट्टी व अंबाबाई पटांगण झोपडपट्टी येथील ३५ झोपडपट्टीधारकांना स्थलांतर करण्यासंबंधी नोटीस बजावण्यात आल्या आहेत.

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार सचिन लंगुटे, उपमुख्याधिकारी अ‍ॅड. सुनील वाळूजकर, बरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजित घोडके यांनी व्यास नारायण झोपडपट्टी व अंबाबाई पटांगण झोपडपट्टी येथे समक्ष पाहणी केली. पूरपरिस्थिती पाहता नागरिकांनी आपले कुटुंब सुरक्षित राहण्याच्या दृष्टीने त्वरित स्थलांतरित करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

स्पीकरद्वारे सर्वांना पुराच्या वाढती पातळीविषयी माहिती दिली जात आहे. पूरपरिस्थिती लक्षात घेता नागरिकांनी स्थलांतरित व्हावे म्हणूनही सूचना देण्यात आल्या आहेत. या ठिकाणी आपत्कालीन परिस्थिती उद्‌भवू नये म्हणून अग्नीशमन वाहन, एकबोट तयार ठेवण्यात आली आहे. तसेच दोनट्रॅक्टर, एक ट्रक नागरिकांचे सामान नेण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच नदीपात्रालगतच्या व्यास नारायण झोपडपट्टी व अंबाबाई पटांगण झोपडपट्टी येथील ३५ झोपडपट्टीधारकांना स्थलांतर करण्यासंबंधी नोटीस बजावण्यात आल्या आहेत.

अंदाजे ७५ कुटुंबे राहू शकतील अशा नगरपरिषदेच्या उपजिल्हा रुग्णालयासमोरील रायगड दिंडी समाज मठ येथे त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच जुन्या कोर्टासमोरील लोकमान्य विद्यालय येथेही व्यवस्था करण्यात आली आहे.

प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याधिकारी सुधीर गवळी, तहसीलदार सचिन लंगुटे, उपमुख्याधिकारी अ‍ॅड. सुनील वाळूजकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजित घोडके, माजी नगराध्यक्ष लक्ष्मणराव शिरसट, माजी नगरसेवक विक्रम शिरसाट, आरोग्य अधिकारी शरद वाघमारे, नागनाथ तोडकर, विद्युत अभियंता राजकुमार सपाटे, प्रीतम येळे हे अधिकारी व कर्मचाऱ्यांची सर्व टीम त्या ठिकाणी कार्यरत आहे. या ठिकाणी परिस्थितीचा अंदाज घेऊन काम पाहत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR