24.6 C
Latur
Saturday, October 19, 2024
Homeमहाराष्ट्रमिहीरने घेतले होते १२ पेग

मिहीरने घेतले होते १२ पेग

वरळी हिट अँड रन प्रकरणात नवा खुलासा

मुंबई : वरळीतील बीएमडब्ल्यू हिट अँड रन प्रकरणाचा तपास सुरू आहे. या अपघातातील मुख्य आरोपी आणि अपघात घडला तेव्हा कार चालवणारा मिहीर शहा यालाही पोलिसांनी मंगळवारी अटक केली आहे. दरम्यान, अपघातापूर्वी आरोपीने मित्रांसोबत मद्य प्राशन केल्याचे वृत्त आहे. स्कूटर चालवत असलेल्या ४५ वर्षीय कावेरी नाखवा यांचा रविवारी या अपघातात मृत्यू झाला. तर कार चालकाने वाहन सोडून घटनास्थळावरून पळ काढला.

अबकारी अधिका-यांनी सांगितले की, मिहिर आणि त्याच्या दोन मित्रांनी १२ मोठे पेग म्हणजेच प्रत्येकी ४ पेग व्हिस्की विकत घेतली होती. बारमध्ये भरलेल्या बिलावरून ही माहिती समोर आली आहे. अल्कोहोलचे हे प्रमाण एखाद्या व्यक्तीला ८ तासांपर्यंत नशेत ठेवू शकते. मिहीर आणि त्याचे मित्र पहाटे दीडच्या सुमारास बारमधून बाहेर पडल्याचे वृत्त आहे. अहवालात उत्पादन शुल्क सूत्रांच्या हवाल्याने असे म्हटले आहे की, हा अपघात रविवारी पहाटे ५ वाजता म्हणजे दारूच्या नशेत असतानाा झाला. या घटनेनंतर जुहू बारचा परवाना रद्द करण्यात आला आहे. विशेष म्हणजे मिहीर २५ वर्षांचा नाही आणि त्याला बारमध्ये दारू दिली जात होती.

१६ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी
न्यायालयाने काल बीएमडब्ल्यू हिट अँड रन प्रकरणातील प्रमुख आरोपी मिहीर शहा याला १६ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली, तर सत्ताधारी शिवसेनेने त्याचे वडील राजेश शहा यांना पक्षाच्या उपनेतेपदावरून हटवण्यात आले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने शहरातील एका बारमध्ये केलेले अनधिकृत बांधकाम पाडले आहे. जेथे इटह हिट-अँड-रन प्रकरणातील प्रमुख आरोपी अपघाताच्या काही तास आधी कथितपणे मद्य पीत होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR