22.9 C
Latur
Sunday, March 3, 2024
Homeमहाराष्ट्रशिवसेना आमदार अनिल बाबर यांचे निधन

शिवसेना आमदार अनिल बाबर यांचे निधन

सांगली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक शिवसेना आमदार अनिल बाबर यांचे निधन झाले आहे. अनिल बाबर यांनी वयाच्या ७४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. अनिल बाबर यांनी सांगलीतील खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. सरपंच ते आमदार असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला. अनिल बाबर यांनी दु्ष्काळी भागातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी संघर्ष केला. शिवसेनेतील फुटीवेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता.

अनिल बाबर यांना त्रास होत असल्याने सांगलीतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज बुधवारी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सांगलीच्या राजकारणात गेल्या जवळपास ५० वर्षांपासून कार्यरत असणा-या त्यांच्या कुटुंबीयांसह समर्थकांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

अनिल बाबर यांनी जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून १९७२ मध्ये काम केले. गार्डी गावचे सरपंच ते आमदार असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला. दरम्यानच्या काळात त्यांनी पंचायत समितीचे सभापती म्हणून काम केले. १९९० मध्ये ते पहिल्यांदा आमदार बनले. यशवंत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम केले. अनिल बाबर यांनी १९९०, १९९९, २०१४, २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला होता.

अनिल बाबर यांचा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना असा राजकीय प्रवास राहिला. अनिल बाबर यांनी त्यांच्या राजकीय कारकीर्दीत पाणी प्रश्नासाठी संघर्ष केला. अनिल बाबर यांनी खानापूर आटपाडी या सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी संघर्ष केला होता. टेंभू योजनेसाठी त्यांनी सातत्याने आवाज उठवला होता.
अनिल बाबर यांचे न्यूमोनिया झाल्याने निधन झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी अनिल बाबर हे आमचे ज्येष्ठ सहकारी होते, कुणाला दुखवायचे नाही, माझे काम आणि मी अशी त्यांची भूमिका होती. मित्र आणि मृदुभाषी सहकारी आपल्यातून निघून गेला, अशी भावना संजय शिरसाट यांनी व्यक्त केली. हा आम्हाला बसलेला मोठा धक्का आहे, असे संजय शिरसाट म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR