28.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeमहाराष्ट्रआमदार पी. एन. पाटील यांचे निधन!

आमदार पी. एन. पाटील यांचे निधन!

कोल्हापूर : प्रतिनिधी
महाराष्ट्रातील काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष आणि करवीर विधानसभा क्षेत्राचे आमदार पी. एन. पाटील यांचे आज निधन झाले आहे. आज त्यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ते ७१ वर्षांचे होते. आमदार पी. एन. पाटील हे गांधी कुटुंबाचे विश्वासपात्र रूपात जाणले जायचे. रविवारी सकाळी बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण चार दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेरीस आज त्यांची प्राणज्योत मावळली. मिळालेल्या माहितीनुसार आमदार पी.एन. पाटील यांच्या पार्थिव शरीरास सकाळी ११ वाजता पैतृक गावात सदौली खालसामध्ये नेण्यात येईल. पी. एन. पाटील हे रविवारी सकाळी बाथरूममध्ये बेशुद्ध अवस्थेत मिळाले. कुटुंबीयांनी त्यांना लागलीच रुग्णालयात दाखल केले.

तसेच चिकित्सकांनी त्यांना चेक केल्यावर सांगितले की, त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच यांची तात्काळ सर्जरी करण्यात आली पण त्यांच्या मेंदूवरची सूज कायम राहिली. यामुळे त्यांची प्रकृती बिघडली. ते वयस्कर असताना देखील काम करीत होते. त्यामुळे त्यांना थकवा येत होता. पण आज चार दिवसांनंतर या लोकप्रिय नेत्याची प्राणज्योत मालवली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR