करमाळा (प्रतिनिधी)
आदिनाथ कारखाना करमाळा तालुक्यातील सभासदांचा कारखाना आहे तालुक्यातले सहकाराचे मंदिर आहे या तालुक्याचे नेतृत्व आमदार संजय मामा शिंदे करतात यामुळे अडचणीत असलेल्या आदिनाथ कारखाना सक्षम करण्यासाठी आमदार संजय मामा शिंदे यांनी ऊस वाहतुकीसाठी शंभर वाहने आदिनाथ कारखान्याला पुरवावीत अशी मागणी प्रशासकीय संचालक महेश चिवटे यांनी केली आहे.अत्यंत अडचणीच्या काळात आदिनाथ कारखाना गाळपासाठी सज्ज झाला आहे.
आरोग्य मंत्री तानाजी सावंत व प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी 15 कोटी रुपयांची आर्थिक मदत करून अधिक आदीनाथ कारखाना सहकार तत्वावर ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. आदिनाथ कारखाना वाचवणे ही करमाळा तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. संजय मामा शिंदे करमाळा तालुक्याचे लोकप्रतिनिधी असून शिंदे कुटुंब यांचे पाच साखर कारखाने आहेत.
या साखर कारखान्याच्या माध्यमातून करमाळा तालुक्यातील सभासदांच्या मालकीचा कारखाना वाचवण्यासाठी आमदार संजय मामा शिंदे यांनी शंभर तोडणी व ऊस वाहतूक यंत्रणा वाहतुकीसाठी पुरवठा करावी.करमाळा तालुक्यातील प्रत्येक पुढारी आदिनाथ वाचला पाहिजे अशी भूमिका जाहीरपणे मांडतो पण स्वतःच्या शेतातला ऊस दुसऱ्या कारखान्याला देतो ही शोकांतिका आहे.राजकारणासाठी आदिनाथ चे संचालक पद मिळावे म्हणून अनेक पदाधिकारी एक एक खेप आदिनाथ ला घालत नाही मात्र आपला स्वतःचा सर्व ऊस इतर कारखान्याला देत आहेत. संजय मामा शिंदे यांनी आदिनाथ ला शंभर वाहने यावेळी उपलब्ध करून दिले तर निश्चितपणे करमाळा तालुक्यातील उत्पादक सभासद संजय मामा शिंदे यांना त्यांचे फळ देतील.