22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeराष्ट्रीयहोळीपूर्वी मोदी सरकार देणार लाखो कर्मचा-यांना ‘गिफ्ट’

होळीपूर्वी मोदी सरकार देणार लाखो कर्मचा-यांना ‘गिफ्ट’

नवी दिल्ली : महागाई भत्त्यात वाढ होण्याची वाट पाहणा-या केंद्रीय कर्मचा-यांना लवकरच मोठी भेट मिळू शकते. येत्या काही दिवसांत केंद्र सरकार महागाई भत्त्यात वाढ करण्याची अधिकृत घोषणा करू शकते, ज्याचा थेट फायदा लाखो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होऊ शकतो.

केंद्रीय कर्मचा-यांचा महागाई भत्ता मार्चमध्ये वाढण्याची शक्यता आहे. यात ४ टक्क्यांनी वाढ होईल. एकूण महागाई भत्ता ५० टक्क्यांवर पोहोचेल. मार्चमध्ये महागाई भत्ता वाढल्यानंतर तो नव्या पद्धतीने मोजला जाईल. पुढील महागाई भत्त्याची आकडेवारी २९ फेब्रुवारीपासून येण्यास सुरुवात होईल.

केंद्रीय कर्मचा-यांना दिल्या जाणा-या महागाई भत्त्यात वर्षातून दोनदा सुधारणा केली जाते. याअंतर्गत सरकार जानेवारी महिन्यात पहिली आणि जुलैमध्ये दुसरी दुरुस्ती करते. केंद्र सरकार पुढच्या महिन्यात मोठा निर्णय घेऊन कर्मचा-यांना होळीची भेट देऊ शकते अशी अपेक्षा आहे.

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये महागाई भत्ता वाढवण्यात आला
ऑक्टोबर २०२३ मध्ये केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचा-यांना त्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांनी वाढ करून भेट दिली होती आणि या वाढीसह त्यांचा महागाई भत्ता ४२ टक्क्यांवरून ४६ टक्के झाला होता. आता या वेळीही महागाईच्या दरानुसार सरकार पुन्हा ४ टक्क्यांनी महागाई भत्ता वाढवू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.

मार्चमध्ये त्याची घोषणा केली जाईल, तेव्हा कर्मचारी आणि पेन्शनधारकांना १ जानेवारी २०२४ पासून त्याचे फायदे मिळतील. मात्र, याबाबत सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR