30.3 C
Latur
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रदेश पूर्णत: हुकूमशाही पद्धतीने चालवण्याचा मोदी सरकारचा निर्धार

देश पूर्णत: हुकूमशाही पद्धतीने चालवण्याचा मोदी सरकारचा निर्धार

विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल

मुंबई : प्रतिनिधी

काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा मोदी सरकार आणि भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवर याबाबत ट्विट केलं आहे. रशियामध्ये जे पुतीनने केलं ते आता मोदी सरकार भारतात करण्याच्या मार्गावर आहे. देश पूर्णत: हुकूमशाही पद्धतीने चालवावा हा निर्धार मोदी सरकारनी केला आहे असं म्हणत वडेट्टीवार यांनी टीकास्त्र सोडले आहे.

या देशात आता जरी निवडणूक प्रक्रिया असली तरी या देशात लोकशाही जिवंत ठेवायची नाही, विरोधक संपवून टाकायचे. रशियामध्ये जे पुतीन करत आहेत… विरोधकच ठेवायचे नाही आणि दाखवायला लोकशाही ठेवायची. संविधानाचे वरचं पान बरोबर ठेवायचं आणि आतलं पूर्ण बदलायचं आणि संविधान शिल्लक आहे अशी अशी बोंब मारत राहायची असं म्हणत विजय वडेट्टीवार यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

जनतेच्या मनात असलेल्या रोषाचा उद्रेक महाभयंकर होईल. आपल्या देशाचे स्वातंर्त्य, संविधान, लोकशाही ज्या घटनेने लोकांना दिला आहे ते आता शिल्लक राहणार की नाही अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे. या निवडणुकीत जनतेच्या मनात असलेल्या रोषाचा उद्रेक महाभयंकर होईल. महाराष्ट्रातून मोदी सरकारच्या समाप्तीला सुरुवात होईल. आम्हाला महाराष्ट्रातील जनतेची साथ मिळत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR