नवी दिल्ली : वृत्तसंस्था
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सध्या धुरळा उडाला असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ८ नोव्हेंबरपासून महाराष्ट्रात प्रचाराचा शंख फुंकला आहे. त्यांनी थेट कॉंग्रेसवर हल्ला सुरू केला आहे. त्यावर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पलटवार करीत महायुती सरकार विचारधारेसाठी सत्तेत आलेले नाही, तर आमदार चोरून सत्तेत आली. महायुती सरळमार्गाने निवडणुका लढत नाही, तर लोकांना भडकावण्याचे काम करीत आहे.
एक है सेफ है की बटेंगे तो कटेंगे यापैकी मोदींची लाईन मानायची की योगींची मानायची, असा सवाल उपस्थित करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर प्रहार केला. तसेच मोदी खोटे बोलणा-यांचे सरदार असल्याची घणाघाती टीकाही त्यांनी केली. नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधींवरही टीका केली. त्याला उत्तर देताना खरगे यांनी एक मुख्यमंत्री बटेंगे तो कटेंगे असे म्हणतात, एक है सेफ है म्हणतात, पण कुणाला तोडायचे आहे.
देशाला एक ठेवण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी जीवन दिले. महात्मा गांधींना कोणी मारले, मारणारे पण तुम्हीच, विभागणारे पण तुम्हीच आहात. खोटे बोला पण रेटून बोला, असे मोदींचे आहे. बेरोजगारी, शेतकरी समस्या, तरुण, नशेची समस्या, महिला सुरक्षित नाही. पण भाजप सरकार आले तर प्रशासन चांगले चालत नाही. मात्र आम्हाला या निवडणुकीत महाराष्ट्राला पुन्हा प्रगती पथावर आणायचे आहे तर भाजपने आमचे आमदार चोरी करुन सरकार स्थापन केले, अशी टीकाही त्यांनी केली.
संविधान संरक्षण कुणाला नकोय, सर्वांना माहित आहे. ते लाल संविधान म्हणाले, शहरी नक्षलवादाला प्रोत्साहन देण्याचा आरोप केला जात आहे. पण मोदींनी राष्ट्रपतींना तेच लाल संविधान भेट दिले, यावेळी त्यांनी त्यांचा तो फोटोही दाखविला.
खोटे-नाटे आरोप करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न
मोदी खोटा आरोप करीत आहेत. कर्नाटकात योजनांची अंमलबजावणी नाही असा आरोप करतात. पण मोदींनी कर्नाटकामधील बजेट एकदा वाचावे. कर्नाटकात वीज सवलत योजनांसाठी ९ हजार कोटींची तरतूद आहे. कर्नाटकात महिलांना बसेस फ्री असून पाच हजार १५ कोटींची तरतूद केली आहे. कर्नाटकात गृहलक्ष्मीसाठी कर्नाटकात दोन हजार एक महिलेला दिले जात आहेत, यासाठी २८ हजार ६०८ कोटींची तरतूद केली आहे. असे असताना ते खोटे बोलातात. ते खोटे बोलणा-यांचे सरदार आहेत.