22.3 C
Latur
Saturday, September 7, 2024
Homeराष्ट्रीयमोदींनी दिली ‘रामसेतु’ला भेट; धनुषकोडिच्या मंदिरात केली पूजा

मोदींनी दिली ‘रामसेतु’ला भेट; धनुषकोडिच्या मंदिरात केली पूजा

धनुषकोडि : अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला अवघे काही तास उरले आहेत. दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी तामिळनाडू दौ-यावर आहेत. त्यांनी आज ‘रामसेतु’ ज्याठिकाणी आहे, त्या ठिकाणाला भेट दिली. यानंतर त्यांनी धनुषकोडि येथील कोंदडरामस्वामी मंदिरात दर्शन घेऊन पूजाही केली.

रविवारी सकाळी दहाच्या सुमारास पंतप्रधान मोदी धनुषकोडि येथील अरिचल मुनाई येथे पोहोचले. याच ठिकाणापासून रामसेतू उभारण्यात आला होता, असे म्हटले जाते. तर, धनुषकोडि येथे बिभीषण पहिल्यांदा श्रीरामाला भेटले होते, आणि त्यांना शरण आले होते. काही आख्यायिकांनुसार, याच ठिकाणी श्रीरामांनी बिभीषणाचा राज्याभिषेक केला होता.

याठिकाणी श्री कोदंडराम स्वामींचे मंदीर आहे. कोदंडरामा शब्दाचा अर्थ धनुर्धारी राम असा होतो. पंतप्रधान मोदींनी आज या मंदिरात दर्शन घेतले, तसंच याठिकाणी त्यांनी विधिवत पूजादेखील केली.

उद्या होणार महासोहळा
पंतप्रधान मोदी सोमवारी सकाळी १०.३० च्या दरम्यान ते अयोध्येला पोहोचतील. त्यानंतर ११ वाजता प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला सुरुवात होणार आहे. दुपारी १ वाजेपर्यंत हा सोहळा सुरू असेल. या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण दूरदर्शन, यूट्यूब आणि पीव्हीआर सिनेमांमध्ये देखील पाहता येणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR