22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रमोदींची गाडी सुसाट धावतेय, तर विरोधकांची गाडी

मोदींची गाडी सुसाट धावतेय, तर विरोधकांची गाडी

मुख्यमंत्री शिंदेंचा मविआला टोला

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. शिंदे यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.
गेल्या काही वर्षांत विभिन्न परियोजना मोदी यांच्या नेतृत्वात सुरू झाल्या. विकासाची गाडी वेगाने सुरू आहे. विरोधी पक्षाची गाडी पटरीवर नीट उभी राहत नाही आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गाडी मोठ्या वेगानेने चालतेय. एक गाडी रुळावर उभी राहत नाही तर दुसरी वेगात सुरू आहे, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. ते मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. भारतीय रेल ही एक आश्चर्य मानले जाते. विरोधी पक्षाची गाडी पटरीवर नीट उभी राहत नाही आणि पंतप्रधान मोदींची गाडी मोठ्या स्पीडने चालते, असे शिंदे म्हणाले. २०१४ पर्यंत ४ किलोमीटर रेल्वे रूळ काम होत होते. आता मात्र १० ते १५ किलोमीटर वेगाने काम होत आहे. रेल्वेमध्ये अनेक योजना आणल्या, असे शिंदे म्हणाले.

विकसित भारतासाठी महाराष्ट्राचे मोठे योगदान
वोकल फॉर लोकल वन स्टेशन वन प्रोडक्ट सुरू केलं. तेराशे करोड रुपयांच्या रेल्वेच्या योजना महाराष्ट्रात सुरू केल्यास यातून रोजगार उपलब्ध करून दिले. मुंबई आणि महाराष्ट्रातील ५६ स्टेशनचे आधुनिकीकरण होत आहे. लातूरमध्ये रेल्वेची वंदे भारत ट्रेन तयार होत आहे. विकसित भारत होण्यासाठी महाराष्ट्र मोठे योगदान देत आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR