सोलापुर : मोहम्मद अयाज संचलीत भारतीय कला प्रसार आयोजित स्वर सम्राट मोहम्मद रफी यांच्या जन्म शताब्दी निमित्त रफी सौ साल लता बेमिसाल या सांस्कृतिक कार्यक्रमात राधा मंगेशकर यांना कला गौरव पुरस्कार तर कुमार करजगी यांना जीवन गौरव पुरस्काराने सम्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार प्रख्यात उद्योजक प्रिसिजन चे अध्यक्ष यतीन शहा यांच्या हस्ते देण्यात आले या वेळी राजशेखर शिवदारे , डॉ विजय राघोजी , डॉ अरुण मनगोळी , डॉ सतीश वळसंगकर , डॉ मिलिंद जोशी , डॉ पुजार , डॉ विजय कानेटकर , डॉ यजेर्वेदी , प्रकाश भुतडा , अनिल भीसे , डॉ नितीन तोष्णीवाल , डॉ मस्के , सुधा अळ्ईमोरे , प्रिंसीपल आसिफ इक्बाल, मीलींद नलेगांवकर सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या सांस्कृतिक कार्यक्रमात मोहम्मद रफी व लता मंगेशकर यांच्या आविट गाण्यांचा आविष्कार सोलापुरकर रसिकांनी अनुभवला. या कार्यक्रमात निवेदक अकबर सोलापुरी यांचा विशेष सन्मान करण्यात आला .संगीत संयोजन साहीर नदाफ, अविनाश ईनामदार, अमीर हुंडेकरी सह गायिका भाग्यश्री चव्हाण तर सुत्रसंचालन मंजुशा गाडगीळ यांनी केले.