40 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeपरभणीअखिल भारतीय क्रॉसकंट्री स्पर्धेत पंजाबचे मोहित, श्रेया विजेते

अखिल भारतीय क्रॉसकंट्री स्पर्धेत पंजाबचे मोहित, श्रेया विजेते

परभणी : अखिल भारतीय आंतर विद्यापीठ क्रॉसकंट्री स्पर्धेत पुरुष व महिला गटाचे विजेतेपद पंजाबच्या मोहित प्रदीपकुमार व श्रेया शामलाल यांनी पटकावले. तर स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद कर्नाटकातील मंगळूर विद्यापीठाच्या संघाने पटकावले.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ व येथील ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या वतीने वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात रविवार, दि.१० रोजी १० किलोमिटर अंतराच्या क्रॉसकंट्री स्पर्धेचे उद्घाटन कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. इंद्र मणि यांच्या हस्ते झाले. यावेळी ज्ञानोपासक महाविद्यालयाचे अध्यक्ष अ‍ॅड. गणेशराव दुधगावकर, एसआरटीचे कुलसचिव डॉ. शशिकांत ढवळे, एव्हरेस्टवीर डॉ. मनिषा वाघमारे, आंतरराष्ट्रीय धावपटू ज्योती गवते, डॉ. राजगोपाल कालाणी, सिनेट सदस्य नारायण चौधरी, जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे, क्रीडा संचालक डॉ. मनोज रेड्डी, स्पर्धा निरीक्षक डॉ. भास्कर माने, प्राचार्य शेख मो. बाबर, उपप्राचार्य विजय घोडके, क्रीडा संचालक डॉ. राजेंद्र तुपेकर यांची उपस्थिती होती. तत्पुर्वी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहन व प्रतिमा पुजन झाले.

१० किलोमिटर अंतराची क्रॉसकंट्री स्पर्धा गुरु काशी विद्यापीठाच्या (पंजाब) मोहित शामलाल याने जिंकली. मंगळूर विद्यापीठाच चंदन यादव उपविजेता ठरला. लव्हली प्रोफेशनल विद्यापीठाचा रिंकूसिंग याने कास्यपदक जिंकले. राजस्थान विद्यापीठाच्य आर्यन सैनी याने चौथे, कोल्हापुरच्या शिवाजी विद्यापीठाच्या अभिषेक देवकते याने पाचवे, रोहिलखंड विद्यापीठाच्या सुचंदर यादव याने सहावे, नेहरु ग्राम भारतीच्या शुभम यादव याने सातवे, मंगळूर विद्यापीठाच्या अक्षयकुमार याने आठवे, गुरु काशी विद्यापीठाच्या रवि याने नववे तर त्याच विद्यापीठाच्या आसिफ खान याने दहावे स्थान पटकावले.

महिला गटाचे विजेतेपद गुरुनानक देव विद्यापीठाच्या (पंजाब) श्रेया शामलाल हिने पटकावले, गोरखपुर विद्यापीठाच्या रंजना राजपुत हिने रौप्यपदक तर कोल्हापुरच्या शिवाजी विद्यापीठाच्या रेश्मा केवटे हिने कास्यपदक प्राप्त केले. मंगळूर विद्यापीठाच्या बसंतीकुमारी हिने चौथे, मुंबई विद्यापीठाच्या साक्षी जड्याड हिने पाचवे, नागपुर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या तेजस्विनी लांबकाने हिने सहावे, काशी विद्यापीठाच्या वंदना हिने सातवे, महप्षी दयानंद विद्यापीठाच्या प्राची हिने आठवे तर मंगळूर विद्यापीटाच्या अंजली कुमारी व सोनीया कुमारी याने अनुक्रमे नववे व दहावे स्थान पटकावले.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण वनामकृवीचे कुलगुरु डॉ. इंद्रमणी यांच्या हस्ते व कुलसचिव डॉ. शशिकांत ढवळे, प्राचार्य शेख मोहम्मद बाबर, प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव, प्राचार्य श्रीधर भोबे, प्राचार्य राजेश देशमुख, सिनेट सदस्य नारायण चौधरी व शितल सोनटक्के, डॉ. मनिषा वाघमारे, क्रीडा संचालक डॉ. मनोज रेड्डी, स्पर्धा निरीक्षक डॉ. भास्कर माने, डॉ. राजेंद्र तुपेकर, स्पर्धा संयोजक प्रा.डॉ. माधव शेजुळ, स्पर्धा सचिव रणजीत काकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

सूत्रसंचालन स्पर्धा संयोजक प्रा.डॉ. माधव शेजुळ यांनी केले. स्पर्धेत पंच म्हणून राज्य अ‍ॅथलेटीक्स संघटनेचे वसंत गोखले, सुमंत वायकर, चंद्रकांत पाटील, डी.के. कांबळे, सुशिल इनामदार, अझहर खपले, रणजीत काकडे, प्रा. नवनाथ भालेराव, यमनाजी भालशंकर, कैलास टेहरे, संतोष पोले, कल्याण पोले, अब्दुल अन्सार, गंगाधर आव्हाड, अमोल नंद, प्रा.डॉ. प्रभाकर पंडीत आदींनी काम पाहिले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR