मुंबई : प्रतिनिधी
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. अखेर आज (९ जून) मान्सून मुंबईत दाखल झाला आहे. हवामान विभागाने मुंबईत मान्सून दाखल झाल्याची घोषणा केली आहे. सर्वसामान्यपणे ११ जून रोजी मान्सून मुंबईत दाखल होत असतो. मात्र, यावर्षी दोन दिवस आधीच मान्सून दाखल झाला आहे.
त्यामुळे मुंबईकरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
दरम्यान, ६ जून रोजीच मान्सून कोकणात दाखल झाला होता. त्यानंतर तीन दिवसांनी म्हणजे आज (९ जून) मान्सून मुंबईत दाखल झाला आहे. आता हळूहळू मान्सून राज्याच्या इतर भागातही सक्रिय होईल.