26.9 C
Latur
Sunday, March 2, 2025
Homeराष्ट्रीयतीन कोटींहून अधिक भारतीय परदेशात वास्तव्यास

तीन कोटींहून अधिक भारतीय परदेशात वास्तव्यास

नवी दिल्ली : अनेक जण चांगल्या भवितव्यासाठी दुसऱ्या देशात भ्रमण करतात आणि यातले काही जण संधी पाहून इथेच स्थायिक होतात. चांगल्या शिक्षणासाठी, रोजगारासाठी आणि व्यवसायासाठी तसेच इतर कारणांसाठी काही लोक आपली भूमी सोडतात. सध्या अश्या परदेशात विवीध कारणांसाठी जाणाऱ्या भारतीयांची संख्या झपाट्याने वाढली आहे. दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत एक अहवाल जारी केला आहे. या अहवालानुसार तब्बल तीन कोटींहून अधिक भारतीय परदेशात स्थायिक झालेले आहेत. त्यांना सहसा ‘ओव्हरसीज इंडियन्स’ म्हणतात.

परराष्ट्र मंत्रालयाच्या अहवालानुसार, जगातील २१० देशांमध्ये ३ कोटी २२ लाख ८५ हजार ४२५ भारतीय परदेशात राहत आहेत. त्यापैकी १ कोटी ३६ लाख १ हजार ७८० लोक अनिवासी भारतीय (एनआरआय) आहेत. म्हणजेच असे भारतीय नागरिक जे व्यवसाय, नोकरी, अभ्यास किंवा इतर कोणत्याही कारणासाठी परदेशात राहत आहेत, ज्यांच्याकडे भारतीय पासपोर्ट आहे. तर १ कोटी ८६ लाख ८३ हजार ६४५ भारतीय वंशाचे लोक (पीआयओ) आहेत. म्हणजेच जे लोक भारतीय वंशाचे आहेत पण त्यांनी आता दुसऱ्या देशाचे नागरिकत्व घेतले आहे. त्याच्याकडे परदेशी पासपोर्ट आहे.

तसेच मुंबईस्थित आरटीआय कार्यकर्ते जतीन देसाई यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, जानेवारी २०१८ ते मे २०१९ या १७ महिन्यांत १२,२२३ भारतीय नागरिकांचा विविध देशांमध्ये मृत्यू झाला आहे. दर महिन्याला ७१९ आणि दररोज २३-२४ भारतीय परदेशात मरण पावले आहेत. हा आकडा धक्कादायक आहे. विशेष म्हणजे, यूएस कस्टम्स अँड बॉर्डर प्रोटेक्शनने आपल्या अहवालात म्हटले आहे की, ऑक्टोबर २०२२ ते सप्टेंबर २०२३ दरम्यान, अमेरिकेत अवैधरित्या प्रवेश करताना विक्रमी ९६,९१७ भारतीय पकडले गेले आहेत.

सर्वाधिक भारतीय अमेरिकेत स्थायिक
आकडेवारीनुसार, सर्वाधिक ४४ लाख ६० हजार भारतीय अमेरिकेत स्थायिक आहेत परंतु संयुक्त अरब अमिरातीमध्ये (युएई) ३४.१९ लाखांहून अधिक रहिवासी असलेले अनिवासी भारतीय आहेत. अमेरिकेतील ४४ लाख भारतीयांपैकी केवळ १२.८० लाख अनिवासी भारतीय आहेत, ३१.८० लाख लोकांनी अमेरिकन नागरिकत्व घेतले आहे.

९० देशांमध्ये ९५२१ भारतीय तुरुंगात
परराष्ट्र मंत्रालयाच्या अहवालानुसार, सध्या ९० देशांच्या ९५२१ अनिवासी भारतीय तुरुंगात आहेत. मध्यपूर्वेत ६२ टक्क्यांहून अधिक लोक तुरुंगात आहेत, त्यानंतर आशियाचा क्रमांक लागतो. भारतीय कैद्यांची तिसरी सर्वात मोठी लोकसंख्या कतारमध्ये आहे. सौदी अरेबियामध्ये सर्वाधिक २२०० भारतीय कैदी आहेत. यानंतर यूएईमध्ये २१४३, कतारमध्ये ७५२, कुवेतमध्ये ४१० आणि बहरीनमध्ये ३१० भारतीय तुरुंगात आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR