22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeराष्ट्रीयखासदार डेरेक ओब्रायन राज्यसभेतून निलंबित

खासदार डेरेक ओब्रायन राज्यसभेतून निलंबित

नवी दिल्ली : संसदेत सुरक्षेच्या मुद्यावरून गुरुवारी लोकसभा आणि राज्यसभेच्या हिवाळी अधिवेशनात मोठ्या प्रमाणावर गदारोळ झाला. दोन्ही सभागृहात विरोधकांनी सुरक्षेतील त्रुटींवरून सरकारवर सातत्याने हल्लाबोल केला. यादरम्यान डेरेक ओब्रायननेही गोंधळ घातला. यानंतर टीएमसीचे खासदार डेरेक ओब्रायन यांना राज्यसभेतून संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले. सुरक्षेतील मोठ्या त्रुटींवरून लोकसभेत बुधवारी दुपारी झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी संसद पुन्हा सुरू झाली. तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांना सभागृहात गैरवर्तन केल्याबद्दल” राज्यसभेतून निलंबित करण्यात आले.

डेरेक ओब्रायन यांनी बुधवारी घडलेल्या घटनेवर चर्चेची मागणी केली. राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांनी टीएमसी खासदाराचे नाव घेत त्यांना तातडीने सभागृह सोडण्याचे निर्देश दिले. जगदीप धनखड यांनी तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन यांना सभागृहाच्या विरोधात वागल्याबद्दल सभागृह सोडण्यास सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी वरिष्ठ मंत्र्यांची भेट घेऊन सुरक्षेतील त्रुटींबाबत चर्चा केली. वास्तविक, बुधवारी पंतप्रधान मोदी संसदेत उपस्थित नव्हते. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याला ते गेले होते.

राज्यसभा तहकूब
चेतावणी देऊनही खासदार डेरेक ओब्रायन आणि इतर विरोधी खासदारांनी त्यांचा निषेध सुरूच ठेवला आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना बुधवारी घडलेल्या घटनेवर उत्तर देण्यासाठी सभागृहात उपस्थित राहण्याची मागणी केली. त्यानंतर राज्यसभा तहकूब करण्यात आली, परंतु त्याआधी जगदीप धनखड यांनी खासदारांना आश्वासन दिले की सुरक्षा भंगाची उच्चस्तरीय चौकशी सुरू करण्यात आली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR