22.2 C
Latur
Thursday, July 25, 2024
Homeमहाराष्ट्रखासदार निलेश लंके कुख्यात गुंड गजा मारणेच्या भेटीला

खासदार निलेश लंके कुख्यात गुंड गजा मारणेच्या भेटीला

पुणे : प्रतिनिधी
खासदार निलेश लंके कुख्यात गुंड गजा मारणेच्या भेटीला गेल्याचे समोर आले आहे. लंके यांनी मारणेकडून शाल आणि श्रीफळ स्वीकारतानाचा व्हीडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होतोय. नवनिर्वाचित खासदार अशा प्रकारे गुंडाच्या भेटीस जाऊन सत्कार स्वीकारत असल्याने समाजात याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अहमदनगरच्या जागेवर शरद पवार गटाकडून निलेश लंके यांनी भाजपाचे सुजय विखे पाटील यांचा २८ हजार ९२९ मतांनी पराभव केला. निलेश लंके यांना ६ लाख २४ हजार ७९७ मते मिळाली तर सुजय विखे पाटील यांना ५ लाख ९५ हजार ८६८ मतांवर समाधान मानावे लागले.

अजित पवार गटातून आयत्या वेळी शरद पवार गटात गेलेले निलेश लंके जिंकून येणार नाहीत असा दावा अजितदादा गटाने केला होता, पण लंके यांनी दमदार विजय मिळवला. त्यानंतर ते काल पुणे दौ-यावर आले होते. यावेळी त्यांनी गुंड गजा मारणेची त्याच्या निवासस्थानी भेट घेतली. तसेच त्यावेळी मारणेने लंकेंचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार केला. गजा मारणेच्या भेटीनंतर लंकेंवर टीकाटिप्पणी देखील होऊ लागली आहे. भेट घेण्याचे कारण लंके यांनी सांगावे याबाबत राजकीय वर्तुळातून विचारणा होत आहे.

गजा मारणेवर याआधी देखील खून, खुनाचा प्रयत्न, मोक्का असे अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परंतु या गुन्ह्यांमधून त्याची सुटका झाली. त्याची सुटका झाल्यावर जंगी मिरवणूक काढण्यात आली होती. याप्रकरणी सुद्धा त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता .

….हम हो जाते हैं बदनाम : अमोल मिटकरी
‘हम आह भी करते हैं तो हो जाते हैं बदनाम, वो कÞत्ल भी करते हैं तो चर्चा नहीं होती…’ आता तुतारी गटाचे शालीन वक्ते कुठे दबले आहेत. ज्यावेळी पार्थ पवारांनी गजा मारणेची भेट घेतली, त्यावेळी गदारोळ माजवला होता. त्यावेळी अजित पवारांनी चूक झाल्याचे मान्य केले होते. आज निलेश लंके सन्मानाने सत्कार स्वीकारत आहेत. बारामती अथवा अहमदनगर लोकसभेमध्ये ज्या घडामोडी घडल्या, गुंडाचा वापर झाला, यामध्ये गजा मारणेचा सपोर्ट होता का ? हे तपासले पाहिजे.. आम्ही सहज भेटलो तर रान उठवले जाते, असे निलेश लंके म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR