27.2 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्रमुंबई पोलिस काढणार श्वानांचा विमा

मुंबई पोलिस काढणार श्वानांचा विमा

मुंबई : प्रतिनिधी
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या सुरक्षेची जबाबदारी जवळपास ५२ हजार पोलिस कर्मचा-यांच्या खांद्यावर आहे. तसंच मुंबईतील अतिसंवेदनशील ठिकाणी सुरक्षेची जबाबदारी पोलिसांच्या श्वान पथकावर देखील आहे. त्यामुळं या श्वानाचा मुंबई पोलिसांकडून विमा उतरवला जाणार आहे.

मुंबई पोलिसांच्या श्वान पथकाकडं वर्षभरात ५०ते ६० कॉल येतात. मुंबई पोलिसांच्या ५२ हजार कर्मचा-यांसह ३२ श्वानांवर मुंबईच्या सुरक्षेची जबाबदारी आहे. मुंबई पोलिसांच्या श्वान पथकाला २०२३ या वर्षात ५८ कॉल्स आले आहेत. तर ड्रग्जची माहिती देण्यासाठी यावर्षी जूनपर्यंत २० कॉल आले आहेत.

त्यामुळं मुंबई पोलिसांसोबतच श्वान पथकावर सुरक्षेची मोठी जबाबदारी असल्यानें त्यांचा विमा उतरवण्यात येत आहे. याआधी ठाण्यातील श्वानांचादेखील अशा प्रकारे विमा काढण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या आठ श्वानांचा २२ हजार १२५ रुपयांचा विमा काढण्यासाठी मुंबई पोलिसांना श्वान पथकाच्या अधिका-याने पत्र पाठविले आहे.

श्वान पथकातील पोलीस निरीक्षक जॉन गायकवाड यांनी सांगितलं, आठ श्वानांसाठी २२हजार १२५ इतका वार्षिक प्रीमियम भरावा लागणार आहे. खर्च मंजुरीसाठी पत्र मुंबई पोलीसांना पाठवले असून लवकरच मंजुरी मिळेल. या विमा पॉलिसीमध्ये श्वानांचा रेबीज, व्हायरल हेपेटायटीस, लेप्टोस्पायरोसिस, व्हायरल एन्टरिटिस यासारख्या आजाराने मृत्यू झाल्यास परतावा मिळतो. तसंच श्वानाची चोरी झाल्यास, शासकीय कामानिमीत्त अथवा शासकीय वाहनातून प्रवास करताना श्वानाला अपघात झाल्यास विमा मिळवता येणार आहे. याबाबत कंपनीकडून ८० टक्के रक्कम दावा केल्यानंतर मिळणार आहे. ही रक्कम मुंबई पोलिसांच्या खात्यात जमा होणार आहे .

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR