20 C
Latur
Sunday, December 1, 2024
Homeछत्रपती संभाजीनगरबीडच्या राजकीय घराणेशाहीत मुंडे वरचढ!

बीडच्या राजकीय घराणेशाहीत मुंडे वरचढ!

बीड : विशेष प्रतिनिधी
राज्यात वाहणा-य राजकीय वा-याची चाहूल आधी बीड जिल्ह्याला लागते आणि उलथापालथीला इथूनच सुरुवात होते. मागच्या ६० वर्षात बीड जिल्ह्यात एकूण ८९ आमदार झाले, यात १० महिला आमदारांचा समावेश आहे. मात्र, यातील सर्वाधिक १० आमदार एकट्या मुंडे कुटुंबातील आहेत.

मातब्बर राजकीय घराण्याला शह देऊन स्वर्गीय विमल मुंदडा यांनीही राजकारणाची सुरुवात केली आणि त्या तब्बल पाच वेळा केज विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्या. विमल मुंदडा यांच्यानंतर त्यांच्या सुनबाई नमिता २०१९ ला विधानसभेला निवडून आल्या आणि आता पुन्हा २०२४ ला त्या विधानसभेला भाजपकडून निवडणूक लढत आहेत. केजनंतर, गेवराईच्या पंडित कुटुंबात सात वेळा आमदारकी होती, या खालोखाल माजलगावच्या सोळंके कुटुंबात सुद्धा तब्बल पाचवेळा आमदार पद राहिले आहे.

बीड जिल्ह्यात मुंडे कुटुंबाची राजकीय घराणेशाही कायम वरचढ राहिली आहे. गोपीनाथ मुंडे यांच्यापासूनच मुंडे कुटुंबात आमदार आणि खासदारकीला सुरुवात झाली, गोपीनाथ मुंडे हे चारवेळा आमदार आणि दोन वेळा खासदार राहिले. त्यांच्यानंतर पंकजा मुंडे यांनीही दोन वेळा विधानसभेची आमदारकी मिळवली आणि आता त्या विधान परिषदेवर आमदार आहेत. पंकजा मुंडे नंतर धनंजय मुंडे यांनी सुद्धा विधान परिषदेचे आमदार त्यानंतर विधानसभेचे आमदार राहिले. आता २०२४ ला विधानसभेचे आमदार म्हणून निवडणूक लढवत आहेत

बीड जिल्ह्यात या राजकीय घराणेशाहीची राजकीय पकड असली तरी अधून मधून आलेल्या राजकीय नेत्यांनी स्वत:चा चांगला जम राजकारणात बसवला होता. त्यात सर्वाधिक जास्त काळ विनायक मेटे यांनी ५ वेळा विधानपरिषदेची आमदारकी मिळवून आपला वेगळा ठसा उमटवला होता. यंदा होऊ घातलेल्या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा याच घराण्यातील राजकीय उमेदवारांची उमेदवारी आपल्याला पाहायला मिळत आहे.

कोणत्या कुटुंबात किती वेळा आमदारकी
गेवराईतील पवार कुटुंबाकडे ४ वेळा
गेवराईतील पंडित कुटुंबाकडे ७ वेळा
माजलगावच्या सोळंके कुटुंबाकडे ५ वेळा
बीडच्या क्षीरसागर कुटुंबाकडे ६ वेळा
आष्टीतील धोंडे कुटुंबाकडे ४ वेळा
आष्टीमधील आजबे कुटुंबाकडे ३ वेळा
केजच्या मुंदडा कुटुंबाकडे ६ वेळा
परळीतील मुंडे कुटुंबाकडे ८ वेळा

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR