27.3 C
Latur
Wednesday, April 2, 2025
Homeमहाराष्ट्रसंतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित महिलेची हत्या?

संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित महिलेची हत्या?

दमानिया यांचा दावा

मुंबई : बीडच्या मस्साजोग येथील संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित एका महिलेची हत्या झाल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. या महिलेची ५ दिवसांपूर्वी हत्या झाली. घटनास्थळी पोलिसांनी पोस्टमोर्टम केले. शनिवारी बीड पोलिस कळंबमध्ये गेल्यानंतर स्थानिक पोलिसांना ही घटना कळली. अनैतिक संबंध की पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने ही हत्या झाली का असा संशय आता व्यक्त केला जात आहे.

कळंबच्या द्वारकानगर येथील एका घरात या महिलेची हत्या झाली. या घराला बाहेरून कुलूप लावण्यात आले होते. पोलिसांकडून जागेवरच पोस्टमोर्टम करून लगेचच अंत्यविधी उरकण्यात आला असे दमानिया यांनी म्हटलं आहे. याबाबत अंजली दमानिया यांनी ट्विट करत म्हटले आहे की, गुड संपता संपत नाही आणि हत्या संपता संपत नाहीत. संतोष देशमुख हत्या प्रकरणात चौकशी झालेल्या महिलेची कळंब शहरात हत्या झाली आहे.

संतोष देशमुखांवर अनैतिक आरोप करण्यासाठी तयार आसलेली कळंब शहरातील द्वारका नगरमध्ये राहत असलेल्या महिलेची हत्या झाल्याचे कळतेय. या महिलेची ७ ते ८ दिवसापूर्वी हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहेत. कुठल्या कारणाने हत्या झाली अन बीड पोलिसांना ही बातमी कळाली अन ते घटनास्थळी पोहचल्यावर नंतरच तेथील रहिवासी व स्थानिक पोलिसांना घटना कळली.

अजून याबाबत अधिकृत माहिती समोर आली नसून संतोष देशमुख हत्या प्रकरणातील काही धागेदोरे हाती लागू नये म्हणून ही हत्या झाली की अनैतिक संबंधातून हत्या झाली अशी चर्चा सुरू आहे असे त्यांनी सांगितले.
त्याशिवाय या प्रकरणाचा सखोल तपास पोलिस करीत आहेत. असं असलं तरी शहर आणि परिसरात या घटनेने दहशत पसरली आहे. शहरातील द्वारका नगरीत राहणा-या लोकांना २ दिवसांपासून उग्र वास येत होता. ज्या घरातून वास येत होता त्या घराला बाहेरून कुलूप लावलेले होते.

दरवाजा तोडून बीड पोलिस व स्थानिक पोलिसांनी आत प्रवेश केल्यानंतर संबंधित महिलेचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह पोलिसांना आढळला व मृतदेह सडलेला असल्यामुळे जागेवरच मृतदेहाचे पोस्टमोर्टम केले. अंत्यविधीही उरकला. ही महिला अनेक पुरुषांना अडकवण्याचे काम करायची आणि त्यासाठी मनीषा आकुसकर आडस, मनीषा बिडवे कळंब, मनीषा मनोज बियाणी कळंब, मनीषा राम उपाडे अंबाजोगाई, मनीषा संजय गोंदवले रत्नागिरी अशा नावांचा वापर करायची असे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR