20.2 C
Latur
Thursday, December 26, 2024
Homeमहाराष्ट्रराजगुरूनगर हत्याकांडातील नराधम अटकेत

राजगुरूनगर हत्याकांडातील नराधम अटकेत

पुणे : बुधवारी पुण्यातील राजगुरूनगर येथे घराजवळ खेळत असताना दोन्ही चिमुकल्या बहिणी बेपत्ता झाल्या होत्या. त्यांचा शोध घेतल्यानंतर रात्री राजगुरूनगर शहरालगत एका इमारतीच्या बाजूला दोन्ही मुलींचे मृतदेह ड्रममध्ये आढळून आले होते. या मुलींची हत्या वरच्या मजल्यावर राहणा-या आचा-याने केल्याचे उघडकीस आले असून पोलिसांनी आरोपीस बेड्या ठोकल्या आहेत. अजय दास (५४) असे त्याचे नाव आहे. मुलींचा खून करून परराज्यात पळून जात असताना पुणे ग्रामीण पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवारी राजगुरूनगरमध्ये घराबाहेर खेळत असलेल्या ८ आणि ९ वर्षांच्या दोन बहि­णींना त्यांच्या घराच्या वर राहणा-या आचा-याने बोलावले. या आचा-याने दोन्ही बहिणींना गोड बोलून स्वत:च्या घरात आणले आणि तिथे सुरुवातीला एका बहिणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी तिने विरोध केला, आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला. आता आपले बिंग फुटेल या भीतीने त्याने एका बहिणीचा जीव घेतला. त्यानंतर घाबरलेल्या आचा-याने दुस-या बहिणीचा तसाच जीव घेतला. त्यानंतर मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी घरालगतच्या इमारतीजवळील ड्रममध्ये मृतदेह ठेवले.

आरोपीला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या
मुलींचे मृतदेह सापडल्यानंतर मुलींसोबत अत्याचार झाला आहे का? असा संशय व्यक्त केला जात होता. आता या प्रकरणी पोलिसांनी तपास करत आरोपीला जेरबंद केले आहे. मुलींचा खून करून परराज्यात पळून जात असताना पुणे ग्रामीण पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. दरम्यान, या घटनेचा निषेध व्यक्त केला जात असून राजगुरूनगर पोलिस स्टेशनबाहेर मुलींच्या नातेवाईकांकडून ठिय्या आंदोलन केले जात आहे. आरोपीला फाशी झालीच पाहिजे, अशी मागणी नातेवाईक करत आहेत. तर मुलींचे मृतदेह ताब्यात न घेण्याचा इशारा देखील नातेवाईकांनी दिला आहे. पोलिस नातेवाईकांशी चर्चा करत असून नातेवाईक आंदोलनावर ठाम आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR